

नवी मुंबईतील कळंबोली येथे बाबाजान नावाच्या भोंदूबाबाने काळी जादूच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप
खालापूर आणि सांताक्रुझ येथेही गंभीर गुन्हे घडल्याचे उघड, दोन महिलांनी तक्रार दाखल केली
पोलिसांनी आरोपीला अटक करून गंभीर गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे
Navi Mumbai News : राज्यभरात सध्या नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण गाजत आहे. दरम्यान अशी प्रकरणे नांदेड, पुण्यातही उघडकीस आली आहेत. यामुळे संतापची लाट उसळली असतानाच आता नवी मुंबईतही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कळंबोली भागात अल्लाचे महत्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करून अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने काही महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
तर या भोंदूबाबाने काही महिलांवर काळी जादू करण्याच्या बहाण्याने देखील अत्याचार केला आहे. दरम्यान आता खालापूर पोलिसांनी कडक पावलं उचलत बाबाजान वर गंभीर गुन्हे दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत. खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या एका फार्म हाऊसवर बोलावणे, विवाहित महिलेवर अत्याचार करणे आणि सांताक्रुझ येथील आई-मुलीला विवस्त्र होण्यास भाग पाडणे, दोघींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा भोंदूबाबा लोकांना तत्त्वज्ञान सांगायचा. तो अल्लाचे महत्व पटवून देत लोकांचा विश्वास संपादन करायचा, त्यांना वश करायचा. काळ्या जादूची भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करत असे. आर्थिक, सामाजीक , शारिरिक , वैवाहिक समस्या दुर करतो असे सांगून तो लोकांना बोलवत असे.
अशाच पद्धतीने त्याने खालापूर येथे एका विवाहितेवर अत्याचार केला. पिडीत महिला आपल्या पतीच्या प्रेयसीबाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती. या वेळी उपाय करण्याच्या बहाण्याने मध्यरात्रीच्या वेळी अघोरी पूजा केली. त्याने महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढून तो दोऱ्याला लावून तो दोरा जाळला. त्याने महिलेच्या शरिराला स्पर्ष करत लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.
तर मुंबईच्या सांताक्रूझ येथील मायलेकीला काळीजादू काढण्यासाठी एक पूजा घालावी लागेल असे सांगत त्यांना विवस्त्र होण्यास भाग पाडलं. एवढंच नव्हे तर त्याने दोघींवर बलात्कार केला. तसेच या दोघींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे.
तसेच धक्कादायक म्हणजे महिलांवर काळी जादू झाली असून ती आपण काढून देतो अशी तो बतावणी करत असे, तर महिलांना एकट्याने खालापूर येथील निर्जनस्थळी असलेल्या फार्म हाऊस बोलवत असे. मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्याने महिलांना अंगावरील सर्व वस्त्रे काढून ठेवायला लावतं असे. ज्या महिला याला विरोध करत त्यांना तो जादूटोणा आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत त्या महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याच्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान असाच प्रकार कळंबोली मधील सोसायटी समोर आल्याने सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास भाग पाडले होते. तर तेव्हा त्याच्यावर गुन्हे दाखल होताच त्यावे तेथून पळ काढला होता. हा भोंदूबाबा गेल्या अनेक वर्षापासून लोकांना अशा पद्धतीने ठगत असून महिलांबरोबर पुरूषांही बळी पाडत आहे. त्याने अनेक पुरूषांही लुटले आहे. त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत.
आता फक्त दोन महिलांनी तक्रार दिली असून त्याच्या लैंगिक अत्याचाराला अनेक महिला बळी पडल्या असाव्यात असा दावा आता केला जात आहे. तर या बाबाजानविरोधात पोलिसांत तक्रार द्यावी असे आवाहन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केले असून अशी भोंदूबाबा कीड सर्व धर्मांमध्ये लागल्याचा आरोप केला आहे.
1. बाबाजान कोण आहे?
नवी मुंबईतील कळंबोली भागात राहणारा एक भोंदूबाबा असून काळी जादूच्या नावाखाली फसवणूक करत होता.
2. त्याच्यावर कोणते आरोप आहेत?
महिलांवर लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर आरोप आहेत.
3. घटना कुठे घडल्या?
कळंबोली, खालापूर आणि सांताक्रुझ येथे या घटना घडल्याचे समोर आले आहे.
4. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5. या प्रकरणाचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो?
अंधश्रद्धेविरोधात जागरूकता वाढण्यास मदत होईल आणि नागरिक अधिक सतर्क होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.