BJP AB Form fraud controversy : 'AB फॉर्म' मिळताच फूल तयारी, पण मंदा म्हात्रे समर्थक उमेदवारांची 'पाटी कोरी'? नवी मुंबई भाजपमध्ये नेमकं काय घडलं!

Navi Mumbai Election: BJP MLA Manda Mhatre Supporters Allege AB Form Fraud : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थक उमेदवारांची भाजपकडूनच फसवणूक झाल्याचा प्रकाराने खळबळ उडाली आहे.
BJP  AB Form fraud controversy
BJP AB Form fraud controversySarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Municipal Election : राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपमधील अतंर्गत कलह उफाळून समोर आला आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली आहे. विशेष करून महिला उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

भाजपकडून फसवणूक झाल्याचा आरोप, नाराज उमेदवार करत आहेत. याच फसवणुकीचा प्रत्यय नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना देखील आला. आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थक उमेदवारांना सही नसलेले 'AB फॉर्म' वाटण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील भाजप अंतर्गत संघर्ष उफाळला असून, त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका निवडणुकीत महायुती तुटली आहे. एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत. भाजपकडून निवडणुकीची मंत्री गणेश नाईक जोरदार तयारी करत आहेत. परंतु, जागा वाटपात भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसाठी उमेदवारी मागितली.

यानंतर मंदा म्हात्रे यांना भाजप (BJP) जिल्हाध्यक्षाकडून तब्बल 13 इच्छुक उमेदवारांना 'AB फॉर्म' देण्यात आले. मात्र या फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची अधिकृत सही नव्हती. यामुळे म्हात्रे समर्थक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अधिकृत सहीशिवाय फॉर्म देण्यात आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला. सही न करता 'AB फॉर्म' देत आम्हाला उल्लू बनवले, असा संताप उमेदवारांनी केला आहे.

BJP  AB Form fraud controversy
NCP : अजितदादांनी टायमिंग साधलं! शिवसेनेत शाखेसाठी लढणारा शिलेदार राष्ट्रवादीत; भाजपचीही वाढवली डोकेदुखी

जिल्हाध्यक्षांकडून 'AB फॉर्म'वर नंतर सही करतो, असे सांगण्यात आले होते. मात्र आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाध्यक्ष संपर्काबाहेर आहे. त्यामुळे आमदार म्हात्रे समर्थक उमेदवार अडचणीत सापडले असून, यावर आमदार मंदा म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला आहे.

BJP  AB Form fraud controversy
Vikram Rathod Quits ShivSenaUBT : शिंदे पक्षप्रमुख, खरी शिवसेना त्यांचीच, 'मविआ'कडून चक्कर मारून येताच, राठोडांची मोठी घोषणा; नीलेश लंकेंनी एका वाक्यात विषय संपवला!

आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या, "'AB फॉर्म' दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष स्वतः गायब आहेत, का किडनॅप केलं आहे, का घाबरून बसले आहेत हे कळायला काही मार्ग नाही. आता 13 उमेदवारांपैकी फक्त पाच लोकांना उमेदवारी देऊ, असं सांगितलं जात आहे. आज त्यांनी त्यांची खेळी केलेली आहे. 'AB फॉर्म'वर सह्या दिलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजीव नाईक यांना आपल्या समर्थकांना 'AB फॉर्म' देण्याच्या सूचना केल्या होत्या."

म्हात्रेंचा फोन प्रतिसाद नाही

मंदा म्हात्रे पुढे म्हणाल्या, "स्वतः भेटण्यासाठी गेले होते, राजेश पाटील यांच्या कार्यातून त्यांना चार वेळा फोन केला, तरी संजीव नाईक आले नाहीत. राजेश पाटील यांनी स्वतः हे फॉर्म आणून दिले. उद्या सकाळी सही करतो, असं देखील त्यांनी सांगितले होते." पण जाणीवपूर्वक माझ्याबरोबर खेळी करत गद्दारी केली, असे म्हणत गणेश नाईक काय चीज आहे, हे मी 35 वर्षे पासून ओळखते, असा घणाघात म्हात्रे यांनी केला.

काल-परवा आलेल्यांना उमेदवारी

'राष्ट्रवादी पार्टी त्यांना कोरे फॉर्म द्यायचे, नंतर ते भरले जायचे, ते काय चीज आहेत, हे मला माहीत आहे. हे सर्व काही मला नवीन नाही. पण कार्यकर्त्यांना दुखवण्याचा यांना कोणी अधिकार दिला. काल-परवा आलेल्यांना पक्षातून उमेदवारी दिली गेली आहे. माझ्या मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी, जीव तोडीत काम केलेलं आहे आणि त्यांनाच उमेदवारी डावलत, कोणती मर्दानगी गाजवता,' असा सवाल करत मंदा म्हात्रे यांनी संताप केला.

म्हात्रे यांनी दिलं चॅलेंज

तुम्ही मर्द आहात ना, तर नवी मुंबई महापालिकेमध्ये 111 उमेदवार निवडून आणा, मग मी मानेल की तुम्ही खरे मर्द आहात. दोन हजार कोटीची माझी कामे चालू आहे. तिथं तुम्ही उमेदवार देऊन काय साध्य करत आहात आणि माझ्याच नावावर तिथं उमेदवार देत आहात. चॅलेंज देते की, आणा 111 जागा निवडून, आम्ही भाजपबरोबर आहोत, आम्ही काही गद्दार करणार नाही. चॅलेंज आहे की, यांनी 111 उमेदवार निवडून आणावेत, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असं आव्हान आमदार म्हात्रे यांनी दिलं.

नाईक यांच्यावर गंभीर आरोप

'यांचा जिल्हाध्यक्ष तुतारीत जातो, फोन करून सांगायचं की माझ्या भावाला मत द्या, रात्री फोन करून सांगायचं याचं काम करा, दुबई-पाकिस्तान मधून आम्हाला धमक्यांचे फोन आणायचे हे काम काही आमच्या बापाने नाही केले. हे काय आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत. यांना फॅमिली शिवाय कोणीच दिसत नाही. यांच्या फॅमिलीमध्ये पाच कार्पोरेटर करायचे आहेत. तीन आहेत, आणखी दोन वाढवणार आहेत. भावाच्या मुलीचं तिकीट मुद्दाम कापलं. वैशाली नाईक हिचं तिकीट मुद्दाम कापलं, ती विधवा आहे, एकटी आहे म्हणून असा प्रकार केला,' असा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com