Sena MLA Disqualification Result : सत्तासंघर्षाच्या लढाईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल दिला आहे. तसेच भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली निवड ही योग्य असल्याचे म्हणत सुप्रीम कोर्टाचा निकाल फिरवला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरेंना मोठा सल्ला दिला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, 'राजकीय पक्षांसाठी घटनेतील १० वी सूची महत्त्वाची दिशा देणारी ठरते. त्यात पक्षांतरांबाबत अनेक बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यानुसार विधिमंडळ पक्षाला कुठलाही अधिकार नाही. व्हीपची निवड ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. व्हीप देण्याचा अधिकार पक्ष-संघटनेचा आहे. मात्र अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाची भूमिका बदलली आहे,' याकडेही पवारांनी लक्ष वेधले.
विधानसभाध्यक्षांनी ठाकरेंना धक्का देत शिंदे यांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले आहे. हे करताना निष्पक्षपातीपणाबाबतही पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'अध्यक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावे लागणार आहे. तेथे १० व्या सूचीतील मुद्दे ठाकरेंची केस मजबूत करण्यास मदत करणार आहे. तेथे ठाकरेंना नक्कीच न्याय मिळेल,' असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, 'आगामी निवडणुकीत आम्ही एकत्रितपणे लोकांसमोर जाणार आहोत. या निकालाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर कसा होतो, हे जनतेला सांगणार आहोत. खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यांनी ती उद्धव ठाकरेंकडे सोपवली होती, हे जनतेला माहिती आहे.'
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.