Manikrao Kokate : धनंजय मुंडेंची अमित शाहांशी भेट! पडद्यामागचं खरं कारण अखेर तटकरेंकडून उघड; राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचालींना वेग?

Sunil Tatkare On Amit Shah-Dhananjay Munde Meeting : सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
Amit Shah-Dhananjay Munde Meeting; Sunil Tatkare
Amit Shah-Dhananjay Munde Meeting; Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून तो अजित पवार यांनी तत्वतः स्विकारला आहे.

  2. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघाल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

  3. धनंजय मुंडे यांच्या अमित शाह भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कारण स्पष्ट केले आहे.

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर कोकाटे यांनी पाठवलेला राजीनामा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी तत्वतः स्विकारला आहे. यामुळं आता महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता असून कोकाटेंविरोधात अटक वॉरंटही निघाला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून पुन्हा कमबॅकसाठी लॉबींग केले जात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात आरो-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या भेटी मागचे कारणच समोर आणले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून सत्तेत वाटेकरी अजितदादांची राष्ट्रवादीही आहे. मात्र एका वर्षातच दादांच्या दोन शिलेदारांची विकेट गेली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आणि मुंडेंना मंत्रि‍पदावर पाणी सोडावे लागले होते. त्यानंतर ते मंत्रि‍पदासाठी आजही आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

याचदरम्यान कोकाटे यांचे आता मंत्रिपद धोक्यात आले असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो त्यांनी अजित पवार यांच्याकडे दिला आहे. तर हा राजीनामा दादांनी तत्वतः स्विकारत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे.

Amit Shah-Dhananjay Munde Meeting; Sunil Tatkare
Manikrao Kokate politics: छगन भुजबळ यांना टार्गेट करता करता माणिकराव कोकाटे स्वतःच झाले हिट विकेट!

त्यामुळे आता कोणत्याही क्षणी कोकाटे यांना अटक होवू शकते. मात्र एकीकडे या घडामोडी होत असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे पुन्हा कमबॅक करण्यासाठी थेट दिल्ली दरबारी फिल्डिंग लावताना दिसले. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावर आता तटकरे यांनी माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्याला धनंजय मुंडे यांनी फोन केला होता. त्याचा एक साखर कारखाना आणि अन्य काही कामांच्या संदर्भातला त्यांनी अगोदरच अमित भाईंची वेळ मागितली होती. एक महिन्यापासून ते तसे प्रयत्न करत होते. नेमकी ती वेळ त्यांना याच घडामोडी दरम्यान मिळाली. पण कोकटेंच्या बाबतीत झालेलं हे सगळं आणि मुंडेंनी घेतलेली भेट त्याच्यामध्ये काही आहे असं मला वाटतं नाही, असेही तटकरे यांनी म्हटलं आहे.

Amit Shah-Dhananjay Munde Meeting; Sunil Tatkare
Manikrao Kokate : ज्यांचे बोट धरुन माणिकराव राजकारणात आले, त्याच दिघोळेंमुळे आता त्यांचे मंत्रीपद गेले..

FAQs :

1. माणिकराव कोकाटे यांनी कोणत्या पदाचा राजीनामा दिला आहे?
➡️ त्यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

2. कोकाटेंचा राजीनामा कोणी स्विकारला आहे?
➡️ उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी तो तत्वतः स्विकारला आहे.

3. कोकाटेंविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे का?
➡️ होय, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाले असून अटक होण्याची शक्यता आहे.

4. धनंजय मुंडे यांनी अमित शाह यांची भेट का घेतली?
➡️ यामागचे कारण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले असल्याचे सांगितले जाते.

5. या घडामोडींचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ पक्षातील अंतर्गत राजकारण आणि सत्तासमीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com