आता अजित पवारही जिल्हा बॅंक वाचवू शकणार नाहीत!

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ रणनीती आखली जात आहे.
ajit pawar, nilesh rane
ajit pawar, nilesh ranesarkarnama

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक (District Bank Election) जाहीर झाली आहे. बॅंकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कोकणात पुन्हा एक सामना रंगला आहे. त्यामुळे शिवसेना (ShivSena) आणि राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातच आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली आहे.

ajit pawar, nilesh rane
"गोपीनाथ मुंडेंमुळे डाटा जमा झाल्याचे सांगतात, पण आता?", भुजबळांचा हल्लाबोल

निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक शिवसेना किंवा महाविकास आघाडीच्या हातातून कधीच गेलेली आहे. अजित पवार यांनी जिल्हा बँक निवडणूक पुढे जाण्यासाठी जवढे प्रयत्न केले, असा आरोप त्यांनी केला. मागच्या वेळी निवडणूक झाली. त्यामुळे सुद्धा जिल्हा बँक जिकली असती, आताची ही निवडणूक होणार ती आम्हीच जिकणार, असा दावा त्यांनी केला. त्यांना बँक कशी टिकवायची याची माहिती नाही. अजित पवार आज बाहेर आहेत. उद्या आतमध्ये सुद्धा जातील असेही नितेश राणे म्हणाले, अजित पवार यांना कोणीही वाचवू शकत नाही. त्या मुळे ते बॅंक वाचवू शकणार नाही, असेही निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. महाविकास आघाडी जिल्ह बॅंक निवडणूक एकत्र पणे लढत आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीमध्ये भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रत्नागिरी जिल्हा बॅंकेत राणेंना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे रत्नागिरीतील पराभवाचा वचपा सिंधुदुर्गमध्ये काढण्यासाठी राणे यांनी रणनिती ठरवली आहे.

ajit pawar, nilesh rane
राम शिंदेंनी आंदोलन केलेल्या मंदिरात राष्ट्रवादीने गोमूत्र शिंपडले : विखेंचा आरोप

राणे यांना आघाडीचे कडवे आव्हान आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक वारंवार लांबणीवर पडत होती. मात्र, अखेर ती जाहिर झाली. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ रणनीती आखली जात आहे. त्यामुळे या बॅंकेच्या निवडणुकीत काय निकाला लागणार याची उत्सुक्ता संपूर्ण राज्यामध्ये आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता ३० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com