"गोपीनाथ मुंडेंमुळे डाटा जमा झाल्याचे सांगतात, पण आता?", भुजबळांचा हल्लाबोल

Chhagan Bhujabal on obc reservation : छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारचे मंत्री हतबल झाले अशी टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मी पंकजा मुंडे यांना एक प्रश्न विचारतो की, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी लोकसभेत नेमकी कोणती मागणी केली? ओबीसी डाटा (Obc reservation) जमा करण्याची केली होती ना?

अलिकडे देखील अनेक भाषणात पंकजा मुंडेंनी सांगितले आहे की, ओबीसींची जनगणना झाली, डाटा जमा झाला तो गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच झाला. पण आता त्याच महाविकास आघाडी सरकारवर का निशाणा साधत आहेत? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

छगन भुजबळ भंडाऱ्यात बोलत होते. भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने भुजबळ भंडारा जिल्ह्यात प्रचारासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की ओबीसी समाजावर अन्याय हा भाजपा करत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूकांचा परिणाम भाजपला भोगावा लागेल, कारण भाजपने ओबीसी समाजाला फसवले आहे, खोटे बोललेले आहेत. असलेला डाटा द्यायला त्यांनी नकार दिला. त्यामुळे भाजपला याचा परिणाम भोगावा लागेल, असेही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal
हवा घ्यायलाही पैसे लागतात, वीजबिल कसे माफ करणार? ऊर्जामंत्री नितीन राऊत

काही ओबीसी संघटनांनी निवडणूकांवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, निवडणूका व्हायच्या असतील होतील, पण यात जर निवडणूकांवेळी घरात बसले तर त्याचा फायदा ज्यांनी डाटा लपवला त्यांच्यावर होईल. त्यामुळे असे करु नका. ओबीसी समाजानी मतदानावर बहिष्कार करून पुन्हा भाजपाला संधी देण्यापेक्षा घराबाहेर या आणि भाजपला या निवडणूकीतून बाहेर फेका, असेही आवाहन भुजबळ यांनी केली.

Chhagan Bhujbal
हप्त्यावर टिव्ही आणायला गेलेले गडकरी रस्त्यांसाठी नवी आयडिया घेवून आले

ओबीसींचे भविष्य म्हणजे आता काही ठिकाणी आम्ही प्रतिनिधीत्व मिळणार नाही हे खरे आहे. पण न्यायालयाने आरक्षण नाकारले नाही. फरक आहे. आम्ही लवकरात लवकर तीन टेस्ट करुन न्यायालयातून पुन्हा आरक्षण आणू, असेही भुजबळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com