नितेश राणेंना जामीन मंजूर झाला अन् निलेश राणे म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
Nilesh Rane Reacts After Nitesh Rane Gets Bail
Nilesh Rane Reacts After Nitesh Rane Gets BailSarkarnama

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळेे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्यावर सध्या कोल्हापूरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितेश यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भावाला जामीन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Nitesh Rane News)

निलेश राणे म्हणाले की, नितेश राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा आनंद आहे. सगळ्याच गोष्टी आज बोलून उपयोग नाही. ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया होती. त्यात आज जामीन मिळाला आहे. काय काय घडले हे बोलायची वेळ आज नाही. न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज आनंदाचा दिवस आहे. हिंदीत म्हण आहे की, 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही' आज त्याचा नेमका अर्थ कळाला आहे. प्रशासनावर दबाव होता की नाही हे बोलायची आज वेळ नाही. जेव्हा ते बाहेर काढायचे तेव्हा बाहेर काढू. आज आनंदाचा दिवस आहे एवढेच सांगतो.

नितेश राणे यांच्या प्रकतीविषयी निलेश राणे म्हणाले की, नितेश यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ते लवकरच बरे होतील. (Nilesh Rane Reacts After Nitesh Rane Gets Bail)

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काल (ता.8) जिल्हा न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. पण न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राणेंचा 30 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला आहे. सरकार पक्षाकडून जामीन अर्ज फेटाळण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती.

Nilesh Rane Reacts After Nitesh Rane Gets Bail
राणेंची प्रकृती आणखी बिघडली; उलट्यांचा त्रास अन् अशक्तपणाही

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. नितेश राणेंच्या जामिनावर 5 फेब्रवारीला पहिली सुनावणी होणार होती. या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी यासाठी केलेला अर्ज परिपूर्ण नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी 7 फेब्रुवारीला ठेवली होती. दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ही सुनावणी झाली नव्हती. काल राणेंच्या जामिनावर सुनावणी झाली. काल युक्तिवाद पूर्ण झाला पण निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर राणेंना जामीन मंजूर झाला आहे.

Nilesh Rane Reacts After Nitesh Rane Gets Bail
देशमुखांनी वसुली सांगितली का? चांदीवाल समितीसमोर वाझेने मारली पलटी

काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा प्रकार घडला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी हल्ला झाला होता. परब हे दुचाकीवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांना मागून धडक दिली होती. यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर दोघांनी परब यांच्यावर टोकदार हत्याराने छातीवर वार केले होते. यात परब गंभीर जखमी झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com