राणेंची प्रकृती आणखी बिघडली; उलट्यांचा त्रास अन् अशक्तपणाही

भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती आणखी बिघडली आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांची प्रकृती आणली बिघडली आहे. त्यांच्या छातीत दुखत असून, त्यांच्यावर कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून, त्यांना काल मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे.तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, राणेंना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. (Nitesh Rane Health Updates)

नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याने आणि मणक्याचा त्रास असल्याने काल पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील हृदयरोग विभागात उपचार सुरू आहेत. राणेंचा त्रास आणखी वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. या पथकात हृदयरोगतज्ञ आणि अस्थिरोगतज्ञांचा समावेश आहे. त्यांना काल मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्यावर आणखी काही चाचण्या केल्या जाणार असल्याचे समजते.

Nitesh Rane
बाबा राम रहीमचा 'व्हीआयपी' थाट! सुरक्षेसाठी सहआयुक्त, डीसीपी, एसीपींसह 300 जवान

न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे हृदयरोगतज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना 7 फेब्रुवारीला रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला हलवण्यात आले. राणेंना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली मागील काही दिवसांपासून सुरू होत्या.

Nitesh Rane
काँग्रेसचं काळं कुत्रं जरी आलं तर..! भाजपच्या अनिल बोंडेंची थेट धमकी

पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर न्यायालयाने राणेंना जामीन मंजूर केला आहे. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नंतर प्रकटले होते आणि काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते. (Nitesh Rane News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com