Nilesh Rane Retired From Politics : 'आता राजकारणात मन रमत नाही'; नीलेश राणेंची निवृत्तीची घोषणा !

Kokan Political News : गेल्या काही महिन्यांपासून नीलेश राणे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते
Nilesh Rane Retired From Politics :
Nilesh Rane Retired From Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Kokan Political News : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही घोषणा केली. दसऱ्याच्या मुहूर्तावरच त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्याने कोकणातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.

Nilesh Rane Retired From Politics :
Bachchu Kadu News : रामचरणी विशेष प्रार्थना करण्यासाठी बच्चू कडू जाणार अयोध्येला !

काय म्हटले नीलेश राणेंनी आपल्या पोस्टमध्ये ?

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी एक लहान माणूस आहे, पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील; पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.

विरोधकांना अंगावर घेणारे खासकरून ठाकरेंच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देणारे अशी ओळख असलेले नीलेश राणे गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. आज अचानक त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Nilesh Rane Retired From Politics :
Dasara Melava News : मराठा बांधव नाराज, म्हणून लोक कमी; अब्दुल सत्तारांची स्पष्ट कबुली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com