नितेश राणेंचं आजपर्यंतचं सर्वात धक्कादायक विधान; म्हणाले, 'महायुती सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात, अन्य धर्मियांनी....'

Nitesh Rane On Love Jihad : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून भाजप नेते नितेश राणे मंत्री झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. नितेश राणेंनी दावा केला की महायुती सरकारला सत्तेत आणण्यात हिंदू समाजाचा मोठा वाटा आहे.

  2. इतर धर्मियांनी मतदानच केलं नाही असा दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

  3. चिपळूणमधील रक्षाबंधन कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Ratnagiri News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून नितेश राणे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. नितेश राणे मंत्री झाल्यापासून वादग्रस्त विधान करतच आहेत. आताही त्यांनी पुन्हा एखदा सर्वात धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी, 'महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे, अन्य धर्मियांनी मतदान केलंचं नाही, नाही असा दावा केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ते रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

याआधी नितेश राणे यांनी, फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असे वादग्रस्त विधान केलं होते. त्यामुळे सत्ताधारी महायुतीची पुरती गोची झाली होती. त्यावेळी नितेश राणेंच्या या वक्तव्याचा समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावरून थेट इशारा देताना, मुस्लिमांबद्दलची केलेली वक्तव्यं खपवून घेणार जाणार नाही, असे म्हणत कान टोचले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांचे कान टोचले होते.

Nitesh Rane
Nitesh Rane : शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारे सनातनी दहशतवादीच! आव्हाडांच्या विधानावर राणेंचा भडका उडाला...

यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे यांनी, मोहल्ला असे म्हणत मुस्लिमांच्याविरोधात वक्तव्य केलं आहे. त्यांनी, राज्यातील महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे, अन्य धर्मियांनी मतदान केलेचं नाही, असा दावा केला आहे. त्यांनी, भाजपने मतांसाठी मोहल्ला फिरला मात्र मुस्लिमांनी मतदान केलेच नाही. ते झाले नाही असा दावा केला आहे. ज्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

यावेळी त्यांनी, महायुतीला सत्तेत हिंदू समाजानेच बसवले. त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. नितेश राणेंनी लव्ह जिहादच्या मुद्द्या पुन्हा हात घालत जरा आपल्या अवतीभवती पाहा म्हणजे लव्ह जिहाद सारखे प्रकरणे दिसतील. तेंव्हा आपल्याला हिंदू समाजाने हिंदुत्ववादी सरकार का सत्तेवर आणलं याची जाणीव होते असेही ते म्हणाले.

लव्ह जिहादला उत्तर द्या

लव्ह जिहाद सारखी प्रकरणे गावागावात होत असून रत्नागिरीतही असे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याला एकच उत्तर असून आपण हिंदू म्हणून खांद्याला खांदा लावून या विरोधात उभ राहायला हवं. जर आपल्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याच्याविरोधात लढण्याची भावना प्रत्येकाची असायला पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले.

राज्यात हिंदूंचे सरकार

महायुतीला सत्तेत हिंदू समाजानेच बसवले असून हे सरकार हिंदूंचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत, त्यामुळे एक भाऊ काम करत असल्याची भावना राज्यातील महिलांची आहे. आपल्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू शकत नाही, लव्ह जिहाद सारखे विषय करू शकत नाही ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनात असल्याचेही नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane
Nitesh Rane On Thackeray: '...हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं!'; उद्धव ठाकरेंच्या अनाजीपंत टीकेला राणेंचं खोचक प्रत्युत्तर

FAQs :

प्र.१: नितेश राणेंचं विधान काय आहे?
उ: त्यांनी दावा केला की महायुती सरकारला सत्तेत आणण्यात फक्त हिंदू मतदारांचा वाटा आहे आणि इतर धर्मीयांनी मतदानच केलं नाही.

प्र.२: हे विधान कुठे करण्यात आलं?
उ: चिपळूण येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात.

प्र.३: या विधानावर काय प्रतिक्रिया आहेत?
उ: विधानामुळे राज्यातील राजकीय तापमान वाढले असून विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com