Nitesh Rane : ग्रामपंचायत न लढणारे मार्गदर्शन करणार, नितेश राणेंनी उडवली खिल्ली

Political News : आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली काम करतो. त्यांनी कारसेवेला जातानाचे फोटो ट्विट केले आहेत. तसेच फोटो ठाकरेंनी दाखवून द्यावेत.
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg: उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आपल्या पक्षाचे अधिवेशन घेत आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने ग्रामीण भागात ठाकरे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत, अनिल परब मार्गदर्शन करणार आहेत. पण यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Nitesh Rane, Sanjay Raut
Devendra Fadnavis: ठाकरे गटाला फडणवीसांनी पुरावाच दिला; फोटो शेअर करीत म्हणाले "बाबरी मशिद पडली तेव्हा मी तिथेच..

उद्धव ठाकरे, संजय राऊत(sanjay raut), अनिल परब यांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही. ते उद्या नाशिक येथे शिवसैनिकांना निवडणूक कशी जिंकायची याचे मार्गदर्शन करणार आहेत, हा फार मोठा विनोद आहे.या शब्दांत राणे यांनी शिवसेनेच्या अधिवेशानाची खिल्ली उडवली. ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवेला जात असल्याचे फोटो दाखवले त्या प्रमाणे ठाकरेंनी देखील आपले फोटो दाखवावेत, असे आव्हान देखील राणे ( Nitesh Rane ) यांनी दिले.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली काम करतो. त्यांनी कारसेवेला जातानाचे फोटो ट्विट केले आहेत. तसेच फोटो ठाकरेंनी दाखवून द्यावेत. त्या काळात रेल्वेच्या माध्यमातून जाण्याची सोय नागरिकांना होती. तुझ्या मालकासारखे फोटो काढायला हेलिकॉप्टर नव्हते, असे म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांचे मागील वेळी 18 खासदार निवडूण आले होते ते नरेंद्र मोदींमुळे. संजय राऊत राम मंदिर उभारण्यात त्यांचा वाटा असल्याचे सांगत आहेत. ते केवळ सामानचा पगार घेऊन तेथे गेले होते. पगार मिळाला नसता तर ते तेथे गेले नसते,असा टोला देखील राऊत यांना राणे यांनी लगावला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com