Nitesh Rane : नितेश राणेंनी नारायण राणेंना तोंडावर पाडलं, भाजपकडून नगराध्यक्षाची घोषणा, केसरकरांच्या प्रयत्नांनाही सुरूंग

Narayan Rane And Deepak Kesarkar’s Efforts : तळकोकणात सुरू असणारा महायुतीतील वाद थांबवण्यासाठी खासदार नारायण राणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर प्रयत्न करताना दिसत आहे.
Sawantwadi Mayor Election, Nitesh Rane, MP Narayan Rane And Deepak Kesarkar
Sawantwadi Mayor Election, Nitesh Rane, MP Narayan Rane And Deepak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद वाढत असताना नितेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

  2. त्यांनी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित केली आहे.

  3. या निर्णयामुळे नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्या युती टिकवण्याच्या प्रयत्नांवर विरजण पडल्याची चर्चा आहे.

Sawantwadi News : तळकोकणात सुरू असणारा महायुतीतील वाद थांबवण्यासाठी जेष्ठ नेते नारायण राणे आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर प्रयत्न करताना दिसत आहे. नारायण राणे यांनी तर महायुती म्हणून न लढल्यास शिवसेनेशी संबंध तोडू असा निर्णयच बोलून दाखवला होता. त्यानंतर केसरकर यांनी किमान आपल्या सावंतवाडी मतदारसंघात युती टिकावी म्हणून भाजपशी चर्चा सुरू केली आहे. दोन फेऱ्या झाल्या असून अद्याप निर्णय झालेला नाही. तर येथील नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडावे अशी मागणी केसरकर यांनी केली आहे. पण आता वडील नारायण राणेंसह केसरकर यांच्या प्रयत्नांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरूंग लावल्याचे समोर येत असून भाजपकडून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केल्याचे येथे बोलले जात आहे. यामुळे महायुतीत पुन्हा खळबळ उडाली आहे.

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी (ता.10) सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह सध्या घोषणा झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. तर हा दौरा खासदार नारायण राणे यांनी महायुतीबाबत केलेल्या भूमिकेनंतर असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ते कोणता निर्णय घेतात याकडे देखील शिवसेनेचे लक्ष लागले होते. त्याप्रमाणे नितेश राणे यांनी आपल्या दौऱ्यात भाजप कार्यालयात आणि त्यानंतर राजवाड्यावर बंद दाराआड चर्चा करत युतीबद्दल चर्चा केल्याचे कळत आहे. तसेच त्यांनी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नितेश राणे यांनी स्वत:लक्ष घालत यश खेचून आणले होते. त्यानंतर आता स्थानिकमध्ये देखील शतप्रतिशत भाजप म्हणत त्यांनी स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिला होता. ज्याला त्यांचे बंधू तथा आमदार निलेश राणे यांनी विरोध करत जिल्हा परिषदेसह नगराध्यक्ष शिवसेनेचाच पण तो नारायण राणे यांच्या विचारांचा असेल असे म्हटले होते. यामुळे येथे महायुतीत वाद चिघळला होता. पण नारायण राणे यांनी येथे निवडणूक महायुती म्हणूनच सामोरे जाण्याची (भाजप-शिवसेना) भूमिका घेतल्याने राजकीय ध्रुवीकरण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Sawantwadi Mayor Election, Nitesh Rane, MP Narayan Rane And Deepak Kesarkar
Mayor Elections : ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय! माजी आमदारांच्या सूनबाईंना उतरवलं नगराध्यक्षपदाच्या रिंगणात, महायुतीची डोकेदुखी वाढली

एकीकडे सध्या केसरकर यांनी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच नितेश राणे यांनी भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत, सावंतवाडी राजघराण्यातील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचे नाव निश्चित केल्याचे कळत आहे. मात्र, राजवाड्यावरील भेटीनंतरही युवराज्ञींच्या उमेदवारीबाबत किंवा युतीच्या निर्णयाबद्दल नेमकी कोणती घोषणा झाली, हे समजू शकलेले नाही.

भाजप जिल्हा सरचिटणीसाची दांडी

कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसूजा यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक आणि जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते नाराज असल्याचेही म्हटले जात होते. आता ही नाराजी समोर आली असून निलेश राणे यांनी घेतलेल्या बैठकीला महेश सारंग उपस्थिती नव्हते. त्याच्या या अनुपस्थितीमुळे पुन्हा ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

Sawantwadi Mayor Election, Nitesh Rane, MP Narayan Rane And Deepak Kesarkar
Mumbai Mayor Election: मुंबई महापालिकेत मोठा डाव; आदित्य ठाकरे महापौरपदाचे उमेदवार? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषय संपवला!

FAQs :

1. नितेश राणेंनी कोणता निर्णय घेतला आहे?
नितेश राणेंनी सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

2. या निर्णयाचा महायुतीवर काय परिणाम झाला?
या निर्णयामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असून भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद तीव्र झाले आहेत.

3. दीपक केसरकर यांनी काय प्रयत्न केले होते?
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी युती टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते.

4. नारायण राणे यांची यापूर्वी काय भूमिका होती?
नारायण राणेंनी या निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा आदेश दिला होता.

5. श्रद्धाराजे भोसले यांची उमेदवारी का चर्चेत आहे?
श्रद्धाराजे भोसले या राणे कुटुंबाशी संबंधित असून त्यांचा उमेदवारी निर्णय महायुतीत बदल घडवू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com