

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या निवडणूका तोंडावर असल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून शिवसेना पक्षाने मनसेला सोबत घेऊन मुंबई जिंकायची रणनीती आखली आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंना महापौर बनवण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर मराठवाडा पाहणी दौरा करीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी यावरून एका शब्दात विषय संपवताना भाजप, पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टार्गेट केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपपैकी पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या याकाळात आता महापालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळेस मुंबई महापालिकेत भाजप व ठाकरेंच्या शिवसेनेत एकीकडे जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) मनसेला सोबत घेऊन मुंबई जिंकायचा प्लॅन केला आहे.
त्यातच मराठवाडा पाहणी दौरा करीत असताना काही पत्रकारानी मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंना महापौर बनवण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असल्याचा प्रश्न केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्पष्टीकरण देत असताना भाजपवर जोरदार टीका करीत आदित्य ठाकरे महापौर होण्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.
उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या महापौर पदाबाबतच्या प्रश्नावर त्याच शब्दात उत्तर दिले. या बातमीचा उगम कुठून झाला हे मला जाणून घ्यायचे आहे. या अफवेचा उगम संघातूनच झाला, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच, अहमदाबादच नाव बदलायचे आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांना अहमदाबादचा महापौर बनवावे लागेल, अशी संघात चर्चा सुरू आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. आता मला बघायचे आहे, अहमदाबादचा महापौर अमित शहा होणार की नरेंद्र मोदी? असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हणत टीकाकरांची बोलती बंद करण्याचा यावेळी प्रयत्न केला.
दरम्यान, याच मुद्द्यावरून मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी टीका केली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलिकडे यांचे राजकारण जात नाही. मुंबईत यांच्याकडून कोणीही महापौर झाला तरी खानाचीच मानसिकता ते राबवणार आहेत. ममदानी आणि आदित्य ठाकरे यांच्यात साम्य हेच असेल ते म्हणजे लेफ्ट अजेंडा आहे. त्यामुळे, मुंबईकर सुजाण आहेत, दरवाज्यावर उभा असलेला धोका त्यांना कळतो, अशी प्रतिक्रिया भाजप त्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.