Eknath Shinde Action : पालघर मारहाण प्रकरणात शिंदेंची मोठी कारवाई, जिल्हाप्रमुखासह 7 जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

Eknath Shinde Suspended Rahul Gharat After Palghar Doctor Assault Case : पालघरच्या रूग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ करणे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह 7 जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
Palghar medical bill dispute hospital staff assault
Palghar medical bill dispute hospital staff assaultsarkarnama
Published on
Updated on

Palghar News : पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत १७ जणांवर गुन्हा दाखल केला. ज्यात पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा समावेश आहे. दरम्यान हे प्रकरण अधिक चिघळण्याच्या आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी कारवाई करत 7 जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच शिवसेना अशा घटनांचे समर्थन करत नाही, असाही थेट संदेशही आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यासह खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. ज्यानंतर शिवसेनेविरोधाक राज्यात संतापाची लाट उसळली होती. यानंतर शिवसेनेचा डोंबिवली पॅटर्न पालघरमध्ये दिसून आला. पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला मारहान केली. तर तेथे असणाऱ्या महिला रिसेप्शनिस्टला शिवीगाळ केली. या मारहाणीसह घातलेल्या धिंगाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पक्षाकडून यावर कोणती कारवाई केली जाते. याकडे राज्याचे लक्ष लागले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. दरम्यान आता या घटनेवर गोव्यात झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मारहाण प्रकरणातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि पालघर शहर प्रमुखासह 7 जणांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले.

Palghar medical bill dispute hospital staff assault
Eknath shinde News : एकनाथ शिंदे 'ॲक्शनमोड'वर; गैरकृत्य करणाऱ्या 'त्या' पदाधिकाऱ्यावर मोठा सर्जिकल स्ट्राइक!

पालघरमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे योग्य नाही. रुग्णाबाबत काही गैरप्रकार घडला असेल तर कायदेशीर तक्रार करायला हवी. स्वत: कायदा हातात घेणं योग्य नाही. अशा कृतीला कधीही समर्थन दिले जाणार नाही. तर शिवसेना अशा प्रकरणांना कधीही समर्थन देत नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Palghar medical bill dispute hospital staff assault
Eknath Shinde news : सुप्रीम कोर्टात पहिल्याच दिवशी वकिलांची सडेतोड मांडणी; सुनावणी संपताच दिल्लीत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, पक्षांतर केलं नाही...

दरम्यान या प्रकरणानंतर शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी पक्षाकडून एक पत्रक काढले आहे. त्यात, शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून, बेजबाबदार वागणुकीमुळे व पक्ष शिस्तभंग केल्याबद्दल पालघर जिल्ह्यातील कुंदन बाळकृष्ण संखे (जिल्हाप्रमुख), राहुल रामदास घरत (शहरप्रमुख), मनिश उर्फ विकी संखे (उप तालुका प्रमुख), राहुल संखे (उप तालुकाप्रमुख), साईराज पाटील (युवासेना जिल्हाप्रमुख), रोहित गावी (उप तालुका प्रमुख युवासेना) आणि ऋषभ वारे (युवासेना विधानसभा प्रमुख) यांच्यावर पक्षाने शिस्तभंगांची कारवाई केल्याचे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com