Assault Case : हॉस्पिटल कर्मचाऱ्याला शिवीगाळ, मारहाण; शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार पुत्रासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Palghar Hospital Assault Case : पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार पुत्रासह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Palghar medical bill dispute hospital staff assault
Palghar medical bill dispute hospital staff assaultsarkarnama
Published on
Updated on

Palghar Crime News : पुन्हा एकदा डोंबिवली सारखीच घटना पालघरमध्ये घडली असून येथे देखील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांची गुंडगिरी आणि दादागिरी समोर आली आहे. येथे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या प्रमाणेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. सध्या याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्यात पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा समावेश आहे.

काही महिन्यांपूर्वी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील एका रुग्णालयात धिंगाणा घातल डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या घटनेमुळे म्हात्रे यांना राज्यातून तडीपार करण्यात आले असून सध्या ते गोव्यात आहेत. मात्र या घटनेनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.

हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच अशाच पद्धतीने शिवसेनेच्या आमदार पुत्रासह जिल्हाप्रमुखाने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यावर हात सोडला आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना विरोधकांच्या रडारवर आली आहे.

Palghar medical bill dispute hospital staff assault
Crime News : काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, पोलिसांनी 7 जणांना ठोकल्या बेड्या; 46 गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये एका जखमी गोविंदाला उपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर रुग्णालयाचे प्रशासनाने उपचार केले. पण यानंतर वैद्यकीय बिलावरून शिवसेनेच्या पदधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद घातला. तर चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टला मारहाण केली.

Palghar medical bill dispute hospital staff assault
Crime News : रायगड हादरले! जेसीबीने धडक दिली, ब्रेकर डोक्यात घालत काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दरम्यान पुन्हा एकदा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात 6 जुलै २०२६ रोजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी घातलेल्या धिंगाण्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांनी तीव्र संताप व्यक्त करत संप पुकारला होता. तर तीन डॉक्टरांना व वैद्यकीय स्टाफला झालेल्या मारहाणीवरून गुन्हा दाखल करत कडक पावले उचलण्याची मागणी सरकारकडे केली होती. ज्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com