MNS Vs Shivsena : मनसे संपली म्हणणाऱ्या भरत गोगावलेंवर टीका केली, शिवसैनिकांनी दुकानात घुसून फोडले; महाडमध्ये खळबळ

Local Body Elections : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. यावरून रायगडमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Attack On Pankaj Umasare MNS Leader
Attack On Pankaj Umasare MNS Leader sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

  2. दोन दिवसांपूर्वी उमासरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर टीका केली होती.

  3. त्याचाच राग मनात धरून हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Mahad News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकारण तापले असून लवकरच निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान महाडमध्ये मनसेच्या नेत्यावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर ही मारहाण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून सगळीकडेच राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे प्रशासन आगामी स्थानिकसाठी जोरदार तयारी करत असून आता मतदार याद्या तयार केल्या जात आहेत. अशातच आज मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येत सत्याचा मोर्चा काढला. तसेच आमचा विरोध निवडणुकीला नसून बोगस मतदार याद्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीआधी मतदार याद्या दुरूस्त करा असे आव्हान करण्यात आले आहे.

एकीकडे ठाकरे बंधू मतदार याद्यावरून आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे महाडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मनसेचे महाड शहरप्रमुख पंकज उमासरे यांना काही जणांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही मारहाण गंभीर स्वरुपाची झाली असून मारेकऱ्यांनी त्यांच्या महाड चवदार तळे येथील दुकानात घुसून मारहाण केली आहे. यामुळे आता शहरात खळबळ उडाली आहे.

Attack On Pankaj Umasare MNS Leader
Local Body Elections 2025: भाजपच्या छत्रछायेखाली शिवसेनेला वाटतेय सुरक्षित; महायुतीसाठी शिंदेच आग्रही

दरम्यान आता या हाणामारी मागे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उमासरे यांनी दोन दिवसांपूर्वी गोगावले यांच्याविरोधात एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. ज्यात त्यांनी भरत गोगावले यांनी मनसेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

गोगावले यांनी नुकताच कोकणातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना वैभव खेडेकर भाजपमध्ये गेल्याने मनसेची ताकद कोकणात राहिलेली नाही. जे काही पदाधिकारी होते. त्यांच्यापैकी काही भाजप, आमच्याकडे गेले आहेत. त्यामुळे मनसेची ताकद आता उरलेली नाही. त्यामुळे शिवसेने समोर मनसेचं आव्हान नाही असे म्हटले हेते. गोगावले यांच्या या दाव्यावरून मनसेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उमासरे यांनी देखील पलटवार करताना, महाड नगर पालिकेत तुमचे दोन नगरसेवक का पडले असा सवाल केला होता.

कोकणातील माणसाने ठरवले तर तुमच्या गदार गटाचा नायनाट होईल असेही म्हटलं होते. तर येत्या निवडणुकीत मनसेची ताकद काय आहे हे देखील दाखवून देवू असे म्हटले होते. याचाच राग मनात धरून त्यांना मारहाण शिवसैनिकांनी केल्याची शक्यता येथे व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसून उमासरे यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Attack On Pankaj Umasare MNS Leader
Local Body Elections 2025: भाजपच्या छत्रछायेखाली शिवसेनेला वाटतेय सुरक्षित; महायुतीसाठी शिंदेच आग्रही

FAQs :

1. महाडमध्ये काय घडलं?
मनसेच्या पदाधिकाऱ्याला काही अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केली आहे.

2. हा हल्ला का झाला असावा असा संशय आहे?
राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात दिलेल्या मुलाखतीच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.

3. मनसेची या घटनेवरील भूमिका काय आहे?
मनसेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे.

4. पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?
पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

5. या घटनेचा निवडणूक वातावरणावर काय परिणाम झाला आहे?
या घटनेमुळे स्थानिक निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com