Panvel Mayor Race : महापौर आरक्षण जाहीर! पनवेलची सत्ता ओबीसीच्या हाती, आमदार प्रशांत ठाकूरांच्या निकटवर्तीयासह विरोधी पक्ष नेत्याच्या पत्नीत रस्सीखेच

Municipal Corporation Reservation 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून पनवेलचा कारभारी हा ओबीसी असणार आहे, राज्यातील महानगरपालिकेंच्या महापौरपदासाठी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
Panvel  Municipal Corporation Reservation
Panvel Municipal Corporation Reservationsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

  • 15 महापालिकांमध्ये 50% महिला आरक्षण लागू झाल्यामुळे महिला नेतृत्व वाढणार आहे.

  • पनवेलसह 8 महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू झाल्याने राजकीय चुरस वाढली आहे.

Panvel municipal corporations : वसंत जाधव

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी गुरूवारी (ता.२२) आरक्षणाची सोडत जाहीर झाली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत या सोडती काढण्यात आल्या. ज्यात राज्यातील 15 महापालिकांवर 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने महिला राज येणार आहे. तसेच यावेळी काढण्यात आलेल्या आरक्षणात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)चे आरक्षण ८ महानगरपालिकांमध्ये जाहीर करण्यात आलं आहे. ज्यात पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर (ओबीसी) , अकोला, चंद्रपूर, उल्हासनगर, अहिल्यानगर आणि जळगाव येथे ओबीसी महिला असे आरक्षण पडले आहे. यामुळे पाच महानगरपालिकेंचा कारभार हा महिला महापौरांच्या हाती असणार आहे.

दरम्यान या सोडतीनुसार पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असून यंदा हे पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी राखीव ठेवण्यात आले आहे. आरक्षणाची सोडत निघताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, विशेषतः सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. महापौरपदासाठी नेमकी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या पार्श्वभूमीवर लॉबिंगही जोरात सुरू झाल्याचे चित्र आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप महायुतीने ५९ नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सलग दुसऱ्यांदा महापालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मित्र पक्षांमध्ये शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक असून उर्वरित 56 नगरसेवक थेट भाजपचे आहेत. त्यामुळे यावेळीही महापौर भाजपचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपकडून महापौरपदासाठी नितीन पाटील, ममता म्हात्रे, डॉ. अस्मिता जगदीश घरत, विकास घरत, प्रवीण पाटील, प्रतिभा भोईर आणि दर्शना भोईर अशी अनेक अनुभवी व प्रभावी नावे चर्चेत आहेत.

Panvel  Municipal Corporation Reservation
Eknath Shinde well played Guardian Ministers Race : शिंदेंकडून कोल्हापुरात करेक्ट कार्यक्रम ! एकाच वेळी मुश्रीफ अन् सतेज पाटलांना शह

आजी-माजी आमदारांचे जवळचे रेसमध्ये

तर ओबीसीसाठी आरक्षण निघाल्यामुळे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांचे नाव महापौरपदासाठी सर्वात आघाडीवर घेतले जात आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेत प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी ममता म्हात्रे यांनाही संधी मिळण्याची चर्चा आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कुटुंबाशी जवळीक असणाऱ्या जगदीश घरत यांच्या कन्या अस्मिता घरत यांच्या नावाचाही पक्षपातळीवर विचार होऊ शकतो, अशी माहिती आहे.

या साऱ्या प्रक्रियेत आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. “ते ठरवतील तोच महापौर” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार असून, विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते महापौर पदासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे भाजपकडून होणारी अधिकृत घोषणा आणि उमेदवाराची निवड, याकडे पनवेल शहराचे लक्ष केंद्रीत झाले आहे

रायगड जिल्ह्यातील ही एकमेव महापालिका आहे. तसेच मुंबईपासून हे शहर जवळ आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. पनवेल महापालिकेमध्ये या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार, आमदार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती.

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा दबदबा पाहायला मिळाला असून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीची युती फेल ठरली. पनवेल महापालिकेच्या 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी 286 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्यामध्ये महायुतीचे ५९ उमेदवार तर शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे १८ उमेदवार निवडून आले आहेत. तर पालिका निवडणुकीत भाजपचे ५५ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे दोन अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि अपक्ष एक विजयी झाला आहे.

Panvel  Municipal Corporation Reservation
Bullock Cart Race News : भाजप आमदाराच्या नावाने बैलगाडा शर्यतीचा धुरळा; पण बक्षिसाची गदाच गेली चोरीला

FAQs :

1) महाराष्ट्रात किती महापालिकांमध्ये महापौर आरक्षण जाहीर झाले आहे?
👉 राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर आरक्षण जाहीर झाले आहे.

2) किती महापालिकांमध्ये महिला आरक्षण लागू झाले आहे?
👉 15 महापालिकांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण लागू झाले आहे.

3) ओबीसी आरक्षण किती महापालिकांमध्ये आहे?
👉 8 महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू झाले आहे.

4) पनवेलमध्ये कोणते आरक्षण लागू झाले आहे?
👉 पनवेल महापालिकेत ओबीसी खुला आरक्षण लागू झाले आहे.

5) या आरक्षणाचा राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 महिला आणि ओबीसी नेतृत्व वाढेल आणि पक्षांच्या रणनीतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com