Diwali Bonus : अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! पनवेल महापालिकेच्या 837 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान; शिक्षकांना मिळणार 15 हजार रुपये

Panvel Municipal Corporation Diwali Bonus : पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे.
panvel municipal corporation
panvel municipal corporationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Panvel News : पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील नियमित कर्मचारी, शिक्षक, आशा वर्कर्स आणि विविध शासकीय योजनांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

पनवेल महानगरपालिका विविध कारणांमुळे अलीकडच्या काळात चर्चेत राहिली आहे. कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरून झालेली टीका, पाणीप्रश्न आणि परिवहन विकास आराखड्यावरून निर्माण झालेल्या वादांमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता दिवाळीच्या सानुग्रह अनुदानाच्या निर्णयामुळे महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे.

महापालिकेच्या महासभेत सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, विविध विभागांतील कर्मचारी आणि योजनांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील 837 नियमित कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 35 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेतील 68 शिक्षकांना प्रत्येकी 15 हजार रुपये देण्यास मंजुरी मिळाली आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

panvel municipal corporation
Pune PCMC Encroachments : मोठी बातमी! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमाणे नियमित होणार, राज्य सरकार निर्णय घेणार!

तपशील पुढीलप्रमाणे :

नियमित महापालिका कर्मचारी : 837 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 35,000 रुपये

महापालिकेतील शिक्षक : 68 शिक्षकांना प्रत्येकी 15,000 रुपये

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) : 2 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये

आशा वर्कर्स : 229 जणींना प्रत्येकी 10,000 रुपये

NHLUM कर्मचारी : 58 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये

प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत (PMEY) : 2 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये

एकूण 1,196 कर्मचाऱ्यांना लाभ

या प्रस्तावानुसार एकूण 1,196 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सणासाठीची खरेदी, घरखर्च आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या रकमेची मदत होणार आहे.

panvel municipal corporation
Panvel Mayor Politics : पनवेलचा ‘महापौर रणसंग्राम’! निष्ठा की समीकरणं? पाटील, म्हात्रे की ठाकूरांचा ‘लेडी ट्रम्प कार्ड’?

कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

महासभेच्या मंजुरीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमित कर्मचाऱ्यांना 35 हजार रुपये, शिक्षकांना 15 हजार रुपये, तर आशा वर्कर्ससह विविध योजनांतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दिवाळीपूर्वी मिळणाऱ्या या आर्थिक लाभामुळे पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांची दिवाळी अधिक आनंदात साजरी होण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com