Raigad Bribery Case : सदनिकेच्या करारनाम्यासाठी दीड लाखांचा सौदा! एक लाख आधीच घेतले, 50 हजार स्वीकारताना दुय्यम निबंधक ACBच्या जाळ्यात!

Pen Sub-Registrar Prashant Jagdale arrested Thane ACB while allegedly accepting Rs50000, Rs1.5 lakh bribery case involving leave and license agreement : रायगडच्या पेणमधील दुय्यम निबंधक प्रशांत जगदाळे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक; निवासी करारनामा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप.
Sub-Registrar Prashant Jagdale
Sub-Registrar Prashant JagdaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pen Sub Registrar Arrested for Bribery : सदनिकेचा निवासी करारनामा करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील पेण येथील दुय्यम निबंधक तथा मुद्रांक निरीक्षक प्रशांत जगदाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे.

मागणी केलेल्या दीड लाख रुपयांपैकी एक लाख रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचा आरोप असून, उर्वरित 50 हजार रुपये स्वीकारताना ठाणे एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

प्रशांत अबाजी जगदाळे हा पेण येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक श्रेणी-1 तथा मुद्रांक निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. एका इमारतीतील सदनिकाधारकाचा निवासी करारनामा करण्यासाठी जगदाळे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती.

Sub-Registrar Prashant Jagdale
Social Welfare Inspector Bribe : 24 लाखांचे बिल अडकवले, पैसे काढण्यासाठी 75 हजारांची मागणी; समाजकल्याण निरीक्षक ACBच्या जाळ्यात!

या तक्रारीची ठाणे (Thane) एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यावेळी निवासी करारनामा करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे आणि त्यापैकी एक लाख रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचे तक्रारीतून समोर आले. त्यानंतर उर्वरित ५० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

Sub-Registrar Prashant Jagdale
Kangana Ranaut FIR : गांधी कुटुंबाच्या मृत्यूंचा उल्लेख भोवला! भाजप खासदार कंगना राणावत यांच्याविरोधात थेट FIR; हिमाचलमध्ये खळबळ!

पेण येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून उर्वरित 50 हजार रुपये स्वीकारताना प्रशांत जगदाळे याला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. पेण पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू होती. शासकीय कार्यालयातच लाचेचा सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील महसूल विभागासह दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.