Thackeray Brothers : तटकरेंचा ठाकरे बंधूंवर दुहेरी वार! ‘पिक्चर अभी बाकी है…’ म्हणत केली मनसे-शिवसेना रिकामी

Raigad Politics : पोलादपूर तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. येथे एकाच वेळी मनसे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
Raigad Politics Thackeray Brothers And NCP MP sunil tatkare
Raigad Politics Thackeray Brothers And NCP MP sunil tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पोलादपूर तालुक्यात मनसे आणि ठाकरे गटातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

  2. हा प्रवेश खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाला असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी ही मोठी ताकद ठरली आहे.

  3. तटकरेंनी ठाकरे बंधुंच्या पक्षांना एकाच वेळी धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Raigad News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचे कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यामुळे पोलादपूर तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. तर तटकरेंनी एकाच वेळी ठाकरे बंधुंना दणका दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील राजकीय वातावरणात आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर बदल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचा नुकताच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माणगाव येथील कुणबी सभागृहात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल मालुसरेंसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला.

यामुळे तालुक्यात आता राजकीय वादळ उठले आहे. या प्रवेशाने स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरण बदलणार असून पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान अधिक बळकट झाल्याचे दावा राजकीय विश्लेषकांचा आहे.

Raigad Politics Thackeray Brothers And NCP MP sunil tatkare
Thackeray Brothers : ठाकरेंच्या बहिणींनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले पाहिजेत; चित्रा वाघांनी सांगितले कारण...

यावेळी तटकरे यांनी ‘पिक्चर अभी बाकी है…’ असा इशारा दिला असून आगामी काळात राष्ट्रवादीत आणखीन पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तर नुकताच झालेल्या या या पक्ष प्रवेशामुळे पोलादपूर तालुक्यात विरोधी पक्षांना मोठं आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान एकीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे कार्यकर्ते- पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहेत. या पक्षांतरामुळे दोन्ही ठाकरे बंधूना निवडणुका समोर असताना पक्ष बांधणी करण्याचं नवं आव्हान पेलावं लागणार आहे.

Raigad Politics Thackeray Brothers And NCP MP sunil tatkare
Thackeray Brothers news,: दिवाळीनंतर मोठा राजकीय धमाका होणार; ठाकरे बंधूंच्या भेटींचा सिलसिला सुरुच! 3 महिन्यात 8 वेळा भेट

FAQs :

1. पोलादपूरमध्ये कोणत्या पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले?
मनसे आणि ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2. हा प्रवेश कोणाच्या उपस्थितीत झाला?
हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाला.

3. या प्रवेशामुळे कोणता पक्ष बळकट झाला?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या प्रवेशामुळे स्थानिक स्तरावर मोठी ताकद मिळाली आहे.

4. ठाकरे गट आणि मनसेला याचा काय परिणाम होईल?
दोन्ही पक्षांना आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये या गळतीचा तोटा सहन करावा लागू शकतो.

5. या प्रवेशाची चर्चा का वाढली आहे?
कारण या प्रवेशाने ठाकरे बंधुंच्या दोन्ही पक्षांना एकाच वेळी मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com