Former Sarpanch Crime : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; हवेत गोळीबार करून धमकीही दिली? माजी सरपंचावर गुन्हा दाखल

Woman Files Case Against Former Sarpanch : भिवंडी तालुक्यातील आन्हे गावचे रहिवासी व डोहळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंचावर लग्नाचे आमिष दाखवून २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane Crime News : लग्नाचे आश्वासन देऊन २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप डोहळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर करण्यात आला आहे. सचिन सिताराम घोडविंदे असे आरोप करण्यात आलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. पाच ते सहा महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. लग्नाचे आश्वासन देत आरोपीने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे.

तक्रारदार महिलेच्या जबाबानुसार, आन्हे गावातील रहिवासी असलेल्या सचिन घोडविंदे यांची संबंधित महिलेशी सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. याच काळात आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन दिले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, भिवंडीतील करिष्मा हॉटेलमध्ये भेटल्यानंतर दोघे कल्याण येथील मेट्रो मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी डोहळे येथील एव्हेन्यू हॉटेलमध्ये मुक्काम केला. यावेळी लग्नाचे आश्वासन देऊन आपल्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच यानंतरही एव्हेन्यू हॉटेल आणि टिटवाळ्यातील फळेगाव रोडवरील जोसेफ फार्महाऊस येथे अशाच प्रकारे अत्याचार झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

Crime News
Crime News : जमिनीच्या वादातून वृद्धाचा मृत्यू? शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

काही दिवसांनी महिलेने लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपीने घरातील भांडणाचे कारण देत टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर महिलेला घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचेही पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

सचिन घोडविंदे लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याने महिलेने न्याय मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे यांच्याकडे मदत मागितली. त्यांना संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर शिंदे यांच्या मदतीने महिलेने पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Crime News
Crime News : बेलापूर न्यायालयात धक्कादायक घटना; जन्मठेपेची शिक्षा सुनावताच कैद्याची पाचव्या मजल्यावरून उडी

या प्रकरणी माजी सरपंच सचिन घोडविंदे यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडघा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.