Raigad Politics : आगामी निवडणुकीसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच; इच्छुकांना आर्थिक बाजूची तयारीही करावी लागणार

Local Body Elections : रायगडमध्ये महायुतीतीच जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुकांसाठी जोरदार रस्सीखेच पहायला मिळत असून इच्छुकांकडून देखील मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
Raigad Politics Local Body Elections
Raigad Politics Local Body Electionssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खालापुर तालुक्यातील राजकीय वातावरण स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले आहे.

  2. चार जिल्हा परिषद, आठ पंचायत समित्या आणि खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.

  3. आर्थिक निकषावर कर्जत तालुक्यातील उमेदवारही खालापुरात लढण्याची तयारी करत असल्याने नवी चुरस निर्माण झाली आहे.

Raigad News : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असून जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुका डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून महायुतीतीच जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. दरम्यान आता येथे उमेदवारीसाठी आर्थिक निकष राजकीय पक्षांकडून लावली जाईल जाण्याची शक्यता आहे. यामुळे येणारी स्थानिकची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर नाही तर आर्थिक निकषांवर जाणार अशी चर्चा येथे रंगली आहे.

येथे राजकीय पक्षांकडून इच्छुकांचा शोध घेताना कार्यकर्त्याच्या बैठकीतच नेत्यांकडून आर्थिक बाजूचं काय, तयारी आहे का? अशी विचरणा होत आहे. तसेच उमेदवार हा स्वत: सक्षम असेल तरच उमेदवारी दिली जाईल असा फतवा प्रमुख राजकीय पक्षांनी काढला असल्याची जोरदार चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांकडून आर्थिक जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान खालापूर तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून येत्या काही महिन्यात येथे चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती यासह खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

Raigad Politics Local Body Elections
Raigad NCP Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; आधी ठाकरेंशी युती केली अन् आता बडा नेता गळाला लावला

येथे आरक्षण सोडतीनंतरच इच्छुक उमेदवारांनी शड्डू ठोकत तयारी सुरू केली होती. वेगवेगळे उपक्रम व भेटीगाठी वर भर देत सणांचे निमित्त साधून बॅनरबाजी केली जातेय. खालापुर, खोपोली शहरासह गावच्या वेशी जवळ बॅनरबाजी होताना दिसत आहे. येथे मात्र आर्थिक निकषावर कर्जत मधील उमेदवार ही लढण्याची तयारी करत आहेत.

ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच भाजपकडून आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठकीत इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी चर्चा करताना फक्त पक्षाकडून येणाऱ्या आर्थिक फंडावर अवलंबून न राहता स्वत:च्या आर्थिक बाजूची तयारी करावी अशा सूचना दिल्या जात आहेत. यामुळे काम करणारे कार्यकर्ते आगामी निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहणार तर नेत्याच्या जीवावर निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवारांची ही आता अडचण होणार आहे. तसेच जे धनिक आहेत अशांनाच आता उमेदवारीचे रेड कार्पेट मिळणार यात शंका राहणार नाही.

रायगडमध्ये भाजपला फायदा

सध्या रायगडमध्ये उसळलेल्या वादामुळे येथे भाजपला फायदा होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत उसळलेल्या वादामुळे येथे राष्ट्रवादी-ठाकरेंची शिवसेना अशी युती झाली आहे. तर एकमेकांचा काटा काढण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना कंबर कसून तयारी करताना दिसत आहे.

यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जाणारे अनेक इच्छुकांनी आपला मार्ग बदलत भाजपकडे वळवला आहे. यामुळे आगामी स्थानिकसाठी भाजपला कार्यकर्ते मिळणारच आहेत. सोबत एखादा दुसरा चांगला चेहराही मिळणार आहे. मात्र मात्र उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची दमछाक होणार आहे.

Raigad Politics Local Body Elections
Raigad Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपसह शिवसेनेला दे धक्का, महायुतीशी फारकत घेत केली ठाकरेंच्या सेनेशी हात मिळवणी; नव्या युतीची घोषणा

FAQs :

1. खालापुरात कोणत्या निवडणुका होणार आहेत?
येथे चार जिल्हा परिषद, आठ पंचायत समिती आणि खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

2. खालापुरातील राजकीय तापमान का वाढले आहे?
स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्यामुळे आणि कर्जतच्या उमेदवारांनी प्रवेशाची तयारी सुरू केल्यामुळे वातावरण तापले आहे.

3. कर्जतचे उमेदवार खालापुरात का उतरत आहेत?
आर्थिक निकषावर आणि मतदारसंघातील समीकरणे लक्षात घेऊन कर्जतचे उमेदवार खालापुरात उमेदवारी देण्याची तयारी करत आहेत.

4. या निवडणुका केव्हा होणार आहेत?
या निवडणुका येत्या काही महिन्यांत पार पडणार आहेत.

5. या निवडणुकांमुळे कोणत्या पक्षांना फटका बसू शकतो?
स्थानीक राजकारणातील बदलांमुळे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com