

रायगड जिल्ह्यातील दासगाव खाडी मतदारसंघातील शिवसेनेच्या संभाव्य उमेदवाराने शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
या पक्षप्रवेश खासदार सुनील तटकरे आणि नेत्या स्नेहल जगताप यांच्या उपस्थित झाला.
या घडामोडीनंतर दासगाव खाडी पट्ट्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे म्हटले जात आहे.
Raigad News : आगामी निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून महायुतीतील पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत, असेच येथे चित्र तयार झाले आहे. अशातच येथे वाढलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादाचा फटका महायुतीला बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी फारकत घेत थेट ठाकरेंच्या शिवसेनेशी हात मिळवणी केली आहे. यामुळे राज्यात पहिल्यांदाच महायुतीला कोकणात तडा गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता आणखी एक मोठा धक्का राष्ट्रवादीने शिवसेनेला देत मोठा नेता गळाला लावला आहे. यामुळे आगामी स्थानिकच्या तोंडावर शिंदे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादीने डबल धक्का दिल्याची चर्चा येथे सुरू झाली आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात महायुतीत विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु झाला आहे. यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात प्रवेश होताना दिसत आहेत. मात्र रायगडमध्ये महायुतीतच फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले असून शिवसेना आणि राष्ट्रवादीत यांच्यात पक्ष प्रवेशाची स्पर्धा सुरू झाली आहे.
नुकताच भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचा निकटवर्तीय आपल्याकडे खेचत राष्ट्रवादीला धक्का दिला होता. याची राज्यभर जोरदार चर्चा झाली. मात्र आता राष्ट्रवादीने उलफेरा घडवत गोगावले यांचा कट्टर समर्थकासह शेकडो कार्यकर्त्यांना प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे रायगड मधील राजकीय समीकरणं बदणार असून शिवसेनेला जोरदार धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या दासगाव खाडी पट्टा जिल्हा परिषद मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुशांत जाबरे यांनी शेकडे कार्यकर्त्यांसोबत आज रविवारी (ता.2) राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी खासदार सुनील तटकरे,स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. जाबरे यांची महाडच्या दासगाव खाडी पट्टा विभागातून रायगड जिल्हा परिषदेसाठी संभाव्य उमेदवारी निश्चित मानली जात होती. तर ते गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पण जाबरे यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.
काका कुडाळकर शिवसेनेत
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील जोरदार वाहत आहेत. येथे शिवसेना आणि भाजपने आगामी स्थानिकसाठी स्वबळाचा नारा दिल्याने दोन्ही पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे.
यादरम्यान येथे राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा कार्यकारी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळकर यांच्या प्रवेशामुळे शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची येथे सध्या जोरदार चर्चा आहे.
1. सुशांत जाबरे कोण आहेत?
ते शिवसेनेचे दासगाव खाडी पट्ट्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आहेत.
2. त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
3. या प्रवेश सोहळ्यात कोण उपस्थित होते?
खासदार सुनील तटकरे आणि स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
4. या प्रवेशामुळे कोणत्या पक्षाला धक्का बसला आहे?
या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचा प्रभाव वाढला आहे.
5. हा प्रवेश आगामी निवडणुकांवर कसा परिणाम करू शकतो?
दासगाव खाडी मतदारसंघात राष्ट्रवादीची स्थिती मजबूत होण्याची आणि शिवसेनेच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.