Shivsena Vs BJP : शिंदेंची रणनीती यशस्वी! राणेंच्या बालेकिल्ल्यातच भाजप केली खिळखिळी?, जिल्हाध्यक्षाच्या दाव्याने खळबळ

Clashes in Mahayuti : तळकोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या वर्चस्व वाद सुरू आहे. तसाच वाद रायगडमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादीत रंगला आहे. यामुळे महायुतीतील घटक पक्षच एकमेकाची जीरवण्यावर उतरल्याचे बोलले जात आहे.
Narayan Rane And Eknath Shinde.jpg
Narayan Rane And Eknath Shinde.jpgSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे अनेक पदाधिकारी प्रलोभने दाखवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा आरोप आहे.

  2. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तक्रार नोंदवली आहे.

  3. यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाचं वातावरण आहे.

Sindhudurg News : तळ कोकणातील रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्ग जिल्हा येथे महायुतीतील दोन पक्षात सध्या जोरदार वाद सुरू आहे. दोन्ही पालकमंत्री आपला जिल्हा सोडून दुसऱ्याच्या जिल्ह्यात आपला पक्ष वाढवण्यासाठी धडपडत असून स्थानिकला स्वबळाचा नारा देताना दिसत आहे. यामुळे महायुतीतील सध्या अलबेल असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाची आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार झाली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रलोभने दाखवून भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेतला जात आहे. ज्यामुळे भाजपचे नुकसान होत असल्याचा आरोप भाजपचे जिल्‍हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला आहे. हा आरोप त्यांनी करताना याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रातून केली आहे. यामुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपमध्ये चिंतेचे वातावरण बनले असून भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाल्‍याचे चित्र आहे.

Narayan Rane And Eknath Shinde.jpg
Shivsena UBT vs BJP : "आता ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही..."; 'सामना'च्या मुलाखतीनंतर भाजपच्या मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

सावंत यांनी शिवसेनेकडून भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सावंत यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महायुतीचा धर्म पाळत भाजपने सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली.

मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेचे वरिष्ठ जिल्हा पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखताना दिसत नाहीत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांना वैयक्तिक प्रलोभने आणि सार्वजनिक कामांची आश्वासने देऊन पक्षप्रवेशासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे महायुतीच्या एकतेला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे शिवसेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांमार्फत सूचना देण्यात याव्यात. स्थानिक पातळीवर तशा सूचना देण्यात आल्या होत्या.

सिंधुदुर्गात भाजपचे संघटन अत्यंत मजबूत असून शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घडवून आणत आहे. हे जर नाही थांबले तर त्यापेक्षा दुप्पट कार्यकर्त्यांचे प्रवेश भाजप घडवून आणेल. मात्र, युतीचा धर्म पाळण्यासाठी भाजपने संयम राखला आहे. शिवसेनेच्या या धोरणामुळे स्थानिक पातळीवरील बैठकींमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून स्वबळावर लढण्याचा आग्रह वाढत असून, त्यांना आवरणे कठीण होत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली आहे. सध्या महायुतीत बिघाडी झाली असून सिंधुदुर्गातील महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.

- प्रभाकर सावंत भाजप जिल्हाध्यक्ष

Narayan Rane And Eknath Shinde.jpg
Shivsena Vs BJP Politics : शिवसेनेची रायगडमध्ये भाजपवर कुरघोडी? माजी उपाध्यक्ष फोडला

FAQs :

प्रश्न 1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमकं काय घडलं आहे?
उत्तर: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे काही पदाधिकारी प्रलोभन दाखवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होत असल्याचे आरोप भाजपने केले आहेत.

प्रश्न 2: प्रभाकर सावंत यांनी काय कारवाई केली आहे?
उत्तर: भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

प्रश्न 3: याचा भाजपवर काय परिणाम झाला आहे?
उत्तर: भाजपमध्ये यामुळे अस्वस्थता आणि तणाव निर्माण झाला असून पक्षांतर्गत चिंता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com