Vaibhav Khedekar, Raj Thackeray
Vaibhav Khedekar, Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray : हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश रोखण्यात राज ठाकरेंचा हात? स्टेटस अन् नाराजीची चर्चा

Vaibhav Khedekar BJP Entry : सगल दुसऱ्यांचा मनसेतून बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकर यांचा भाजपप्रवेश थांबवला. यामुळे तळकोकणात या मागे एका बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा होती. तर हा बडा नेता दस्तुरखुद्द राज ठाकरेच असल्याची चर्चा आता उघडपणे सुरु झाली आहे.
Published on
Summary
  1. मनसेतून बडतर्फ झालेले वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश थांबवला गेला आहे.

  2. या प्रकरणामागे एका बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा सुरु होती.

  3. अखेर हा नेता दस्तुरखुद्द राज ठाकरेच असल्याची चर्चा उघडपणे सुरु झाली आहे.

Ratnagiri News : तळकोकणात मनसे वाढणाऱ्या खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि तिघांना पक्षाने थेट बाहेरचा रस्ता दाखवला. भाजपशी सलगी केल्याच्या आरोपावरून राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर पक्षाने निर्णय घेत खेडेकर आणि तिघांची हाकालपट्टी केली होती. यानंतर खेडेकर यांनी थेट पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांचा दोन वेळा भाजप प्रवेश हुकला. यामुळे आता तळकोकणात मोठ्या चर्चा सुरू झाल्या असून प्रवेश रोखण्यात बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचे बोलले जात होते. तर आता तो राजकीय बडा नेता दस्तुरखुद्द राज ठाकरेच असल्याची चर्चा आता उघडपणे सुरु झाली आहे. तसेच खेडेकर यांच्या एका स्टेटसची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

याच महिन्याच्या सुरूवातीला खेडेकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनसेमधून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर ते कोणता राजकीय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते. तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशीच शक्यता व्यक्त केली जात होती. यानंतर भाजपचे मंत्री तथा भाजपचे रत्नागिरी जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री नितेश राणे यांनीच गणेशोत्सवात खेडमध्ये येऊन खेडेकर यांच्या प्रवेशाची तारीखच सांगितली होती. मात्र त्यांनंतर त्यांचा जो पक्ष प्रवेश रखडला तो रखडलाच.

पण आता त्यांच्या प्रवेश रखडण्यामागे कोणाचा हात आहे की भाजपलाच आता खेडेकर नको झालेत अशा चर्चा खेडसह जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिकेसह स्थानिकच्या निवडणुका लक्षात घेता दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच हा पक्ष प्रवेश होऊ नये अशी तजवीज केल्याचे बोलले जात आहे.

Vaibhav Khedekar, Raj Thackeray
Vaibhav Khedekar : हकालपट्टी केलेला मनसे नेता गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत गेला, मात्र भाजप प्रवेशाला दुसऱ्यांदा ब्रेक

खेडेकर यांचा भाजप प्रवेश होवू नये यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गळ घातल्याचे बोलले जात आहे. तर सध्याच्या घडीला दोन्ही बंधू एकत्र येत असल्याचे चित्र भाजपसाठी समाधानकारक नसल्याने कदाचित भाजपने देखील राज ठाकरे यांनी हाकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर आदी पदाधिकारी दूर ठेवल्याचीही चर्चा आहे. मात्र या चर्चेदरम्यान भाजपच्या काही नेत्यांनी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही म्हटले आहे. पण तो कधी याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. यामुळे खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सध्या संभ्रम कायम आहे. तर खेडेकर यांचा प्रवेश रखडण्यामागे भाजपमधीच काही जुन्या जाणत्या नेत्यांचाही हात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या अशा राजकीय चर्चां सुरू असतानाच आता खेडेकर यांचा व्हिडिओ स्टेटसची जोरदार चर्चा आहे. ज्यात खेडेकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत भेटीचा आणि गाड्यांच्या ताफा असलेला व्हिडिओ स्टेटसला ठेवला आहे. या स्टेटसमध्ये खेडेकर यांनी, दहशत तर डोळ्यात असली पाहिजे. हत्यार तर हवालदाराकडे पण असते. आयुष्याच्या पुस्तकाचं एक पान काय फाटलं लोकांना वाटतं यांचा कार्यकाळ संपला?

पण महाराज सांगतात, ज्या वेळेला लोकांना वाटतं ना, आपण संपलोय, त्यावेळेस एक बाकी संयमाचा डाव टाकायचा असतो, असे म्हटलं आहे. तसेच आणखी एका स्टेटसमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांचे फोटो ठेवत, मैत्रीत विश्वास असेल तर कोणतीही अडचण लहान वाटते" असे म्हटलं आहे. सध्या त्यांच्या या स्टेटसची खेडसह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

खेडेकरांचा कधी कधी रखडला प्रवेश

खेडेकर यांचा भाजप प्रवेश होईल अशी घोषणा नितेश राणे यांनी करत 4 तारीख सांगितली होती. मात्र मराठा आरक्षण आणि खासदार नारायण राणे यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे तो रद्द झाला. दुसऱ्यांचा 23 सप्टेंबर रोजी मुंबईत जाऊन देखील खेडेकर यांचा पक्ष प्रवेश झाला नाही. त्यांच्या स्वागताला भाजपचा एकही मोठा नेता पक्ष कार्यालयात गेला नाही. यावरून आता खेडेकर यांचा राजकीयदृष्ट्या अपमान झाल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ही नाराजी दूर करण्याचे सध्या स्थानिकचे भाजपने नेते करत असून त्यांनी खेडेकरांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे.

Vaibhav Khedekar, Raj Thackeray
Vaibhav Khedekar : दोनवेळा प्रवेश हुकला; बडतर्फ मनसे नेत्याचा भाजप प्रवेश बड्या राजकीय नेत्यामुळे रखडला

FAQs :

प्र.१: वैभव खेडेकर कोण आहेत?
उ: ते मनसेतील माजी नेते असून त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते.

प्र.२: खेडेकरांचा भाजप प्रवेश का थांबवला गेला?
उ: यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.

प्र.३: या प्रकरणामागे कोणाचा हात असल्याचे बोलले जात आहे?
उ: राज ठाकरे यांचा हात असल्याची चर्चा उघडपणे होत आहे.

प्र.४: या घटनेचा तळकोकणात काय परिणाम झाला?
उ: स्थानिक पातळीवर मोठी खळबळ माजली असून नवे समीकरण चर्चेत आले आहे.

प्र.५: यामुळे कोणत्या पक्षांना फटका बसू शकतो?
उ: भाजप आणि मनसे दोन्ही पक्षांसाठी हे प्रकरण डोकेदुखी ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com