
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपमध्ये दाखल झाले.
रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कोकणात राष्ट्रवादी गटाचे अस्तित्व धोक्यात आले.
Mumabi/Ratnagiri News : तळ कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार पक्षाला जबर धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी आज (ता.19) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत यादव यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. यामुळे कोकणातील शरद पवार गटाचे उरलेसुरले अस्तित्वही संपुष्टात आले असून भाजपने तळ कोकणच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आणल्याचे बोलले जातेय.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले प्रशांत यादव यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा अवघ्या 6800 मतांनी पराभव झाला होता. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले होते. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना चांगली साथ दिली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून ते नाराज असल्याचे चर्चा होती.
दरम्यान त्यांच्यावरूनच रत्नागिरीत राजकीय वाद सुरू झाला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी यादव यांची भेट घेऊन त्यांना शिवसेनेच्या प्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र यादव यांना भाजपमध्ये आणण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या शब्दानंतर यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यादव यांच्या प्रवेशाची माहिती देतानाच नितेश राणे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बळ देण्यासाठी भाजप स्वबळावर लढण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी चिपळूण मतदारसंघाचा पुढचा आमदार हा भाजपचाच असेल, असेही मोठे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात नवा वाद सुरू झाला आहे. या वादातच आता यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी त्यांच्यासह चिपळूण संगमेश्वर भागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्यात माजी जिल्हा परिषद सभापती, तीन माजी जिल्हा परिषद सदस्य, सहा पंचायत समितीचे माजी सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, माजी अध्यक्ष शिक्षक पतसंस्था, विधानसभा क्षेत्राध्यक्ष, सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्यांसह माजी ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.
पण दुर्दैवाने पराभव झाला
यावेळी यादव यांनी, विधानसभेला आपला झालेला पराभवाची सल बोलून दाखवली. त्यांनी, गेल्यावर्षी विधानसभेची आम्ही निवडणूक लढवली, सहकाऱ्यांनी जीवाचं रानं केलं. पण दुर्दैवाने आमच्या पदरी निराशा आली. या पराभावाने खचून न जाता आजही माझे सहकारी आणि कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. आता माझं नैतिक कर्तव्य हे या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आहे. त्याासाठी भाजपने मला ताकद द्यावी. भाजपने ताकद दिल्यास आम्ही तळ कोकणात भाजपला नंबर एकचा पक्ष बनवू अशा ग्वाही यादव यांनी दिले आहे. तर कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा व्हावी अशाही यादव यांनी विनंती केली.
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी, प्रशांत यादव यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला असून आमचा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. याच्याआधीही मी आमचा पक्ष बळ देणारा असल्याचे सांगितले होते. इतरांचे नाही तर आमचे उदाहरण जरी डोळ्यासमोर ठेवले तर भाजपने आम्हाला किती सन्मान दिला हे कळून जाईल. आम्ही तुम्हाला ताकद देऊ पण तुम्ही हा तुमची जी काही ताकद असेल ती लावा. तुम्हीही तुमचा जलवा दाखवा. आता आता विधानसभा 2029 मध्ये आपल्या विचारांचा आमदार येथे निवडून येईल, असे काम करायचे आहे. भाजप प्रत्येक घराघरापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे.
दरम्यान त्यांनी शिवसेना पदाधिकारी किंवा उदय सामंत यांचे नाव न घेता, कोणी तुम्हाला फोन करून धमकी दिली तर आमच्या स्टाईलने उत्तर द्या. बघून घेऊन बोलण्याचे आता ते दिवस गेले. आता तसे फोन आल्यास त्या लोकांना तुम्ही फोन टाका. त्यांना उत्तर द्या. आता कोकण भाजपचा बालेकिल्ला बनवा असून असा एकही मतदारसंघ नाही जेथे भाजपच्या मदतीशिवाय आमदार होणार नाही. त्यामुळे आता शतप्रतिशत भाजप अशीच वाटचाल आपल्याला करायची असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
कधी काळी हा चिपळूण मतदारसंघ शिवसेनेचा होता. मात्र आता तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला आहे. आता शेखर निकम यांच्या ताब्यातील हा मतदारसंघ काढून घेण्यासाठी भाजपचे डाव टाकला असून प्रशांत यादव चार वर्षे लांब असणाऱ्या विधानसभेची कशी तयारी करतात? भाजपला दिलेल्या शब्दा प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत कोणता जलवा दाखवतात हे पाहावं लागेल.
प्र.१: प्रशांत यादव कोणत्या पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले?
➡️ ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये दाखल झाले.
प्र.२: त्यांच्या प्रवेशावेळी कोणते नेते उपस्थित होते?
➡️ रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
प्र.३: या प्रवेशाचा कोकणातील राजकारणावर काय परिणाम झाला?
➡️ शरद पवार गटाचे अस्तित्व कोकणात जवळजवळ संपुष्टात आले असून भाजप बळकट झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.