Raigad Schoolgirls : ‘पोटातलं पाणीही हलत नाही’ छत्रीचा माईक करून रिपोर्टींग, शाळकरी मुलींना आदित्य ठाकरेंकडून खास भेट

Aditya Thackeray gives cycles to schoolgirls : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे-खांडपे रस्त्याची दुरवस्था तीन शाळकरी मुलींना दाखवली होती. यावेळी त्यांनी दाखवलेल्या पत्रकारितेच्या धाटणीतील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
Raigad Karjat Schoolgirls Report Pothole Road Problem and Aditya Thackeray
Raigad Karjat Schoolgirls Report Pothole Road Problem and Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raigad Schoolgirls Road Issue Viral Report : रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंडीवडे गावातील खड्डेमय रस्त्याची व्यथा छत्रीचा माईक करत रिपोर्टिंग केलेल्या शाळकरी मुलींची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली. साम टीव्हीने दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट हा राज्य सरकारवर झाला तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी रस्त्यावर खडी टाकण्याच्या सूचना केल्या. यानंतर प्रशासनाकडून येथील खड्डे त्वरित बुजवण्यात आले.

विद्यार्थिनींच्या या कामाची दखल घेत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुलींशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. तसेच ‘कुणी तुम्हाला सतावले, तर मला लगेच सांगा. आम्ही तुमच्यासोबत आहोत,’ असा धीर त्यांनी दिला. यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी या धाडसी मुलींना खास भेट दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे-खांडपे रस्त्याची दुरवस्था नेहा, ज्योत्स्ना आणि मानसी या शाळकरी मुलींनी धाडसाने दाखवली होती. शाळेला जाता जाता या मुलींनी छत्रीचा माईक करत गंमतीशीर रिपोर्टिंग करत गावातील खड्डेमय रस्त्याची व्यथा मांडली होती. ज्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ राज्यभर चांगलाच चर्चेत आला होता.

Raigad Karjat Schoolgirls Report Pothole Road Problem and Aditya Thackeray
Schoolgirls Viral Video Impact : कर्जतमधील खड्ड्यांवर शाळकरी मुलींचं स्पेशल रिपोर्टिंग, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाला खडबडून जाग; थोरवेंकडून तातडीने दखल

ज्यानंतर प्रशासनासह स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी समस्येची दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग दिला होता. खड्डे खडी टाकून भरण्यात आले होते. यानंतर त्या मुलींनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढाकार घेतला.

तसेच युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी नेहा, ज्योत्स्ना आणि मानसी या विद्यार्थिनींसह त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला होता. तसेच ‘कुणी तुम्हाला सतावले, तर मला लगेच सांगा. आम्ही तुमच्यासोबत आहोत,’ असा धीरदेखील दिला होता.

Raigad Karjat Schoolgirls Report Pothole Road Problem and Aditya Thackeray
Karjat Road Viral Video : ‘पोटातलं पाणीही हलत नाही’; 3 मुलींचं रिपोर्टिंग व्हायरल, आदित्य ठाकरेंनी घेतली दखल

यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी या विद्यार्थिनींसाठी खास भेट पाठवली असून ती त्यांना मिळाली आहे. नेहा, ज्योत्स्ना आणि मानसी या विद्यार्थिनींनी दाखवलेल्या धाडसाचे पुन्हा एकदा कौतुक करत आदित्य ठाकरे यांनी या मुलींना सायकली भेट दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com