Schoolgirls Viral Video Impact : कर्जतमधील खड्ड्यांवर शाळकरी मुलींचं स्पेशल रिपोर्टिंग, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाला खडबडून जाग; थोरवेंकडून तातडीने दखल

Schoolgirls Ground Report Impact : राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बातम्या होत असतात. पण विद्यार्थिनींच्या एका ग्राउंड रिपोर्टिंगमुळे मात्र प्रशासनाची धावपळ उडाल्याचे आता समोर आले आहे.
female students highlighted the poor condition of the Karjat–Kondhivade road
female students highlighted the poor condition of the Karjat–Kondhivade roadsarkarnama
Published on
Updated on

Raigad News : राज्यात सध्या अक्षरशः रस्त्यांची चाळण झाल्याचे समोर आले असून विविध जिल्ह्यात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे कळत नसल्याचे दिसत आहे. यावरून स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा देखील दिल्याच्या बातम्या झाल्या आहेत. पण कोकणातील रायगड जिल्ह्यात विद्यार्थिनींनी केलेल्या गंमतीशीर व्हिडिओने मात्र प्रशासनासह राजकीय पक्षांना आणि आमदारांना खडबडून जागे केले आहे.

कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदीवडे गावातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या व्हिडिओची दखल आता शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. त्यांनी या रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याच्या सूचना केल्या आहेत. यानंतर आता येथे खडी टाकण्यात आली असून पावसाळा संपला की रस्ता करण्यात येईल अशी माहिती देखील आमदार थोरवे यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील विद्यार्थिनींनी अक्षरशः रस्त्यांची चाळण झाल्याचे सांगत व्हिडिओ केला होता. छत्रीला माईक बनवून शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टिंग केले होते. तसेच रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे कळतच नाहीय, असे म्हणत गंमतीशीर व्हिडिओ बनवला होता. आता हाच व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून या गंभीर मुद्द्याकडे प्रशासनासह आमदारांचे लक्ष गेले आहे.

female students highlighted the poor condition of the Karjat–Kondhivade road
Raigad Politics : शिवसेनेनं ताकद लावलेलं पालकमंत्रिपद राज ठाकरेंसाठी 'फालतू' गोष्ट : रायगडच्या वादावरून फडणवीस सरकारला सुनावलं

या तुफान व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, येथील रस्त्यावर खड्डे पडले असून आम्ही ते नाकारत नाही. तो एमडीआर रस्ता असून त्यावरील खड्डे तात्काळ भरण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. त्या रस्त्यावर खडी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

तसेच कर्जतमध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याने हे रस्ते खराब झाल्याचे कारण थोरवे यांनी दिले आहे. तसेच तात्काळ खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून पावसाळा संपला की रस्ता नव्याने करण्यात येईल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

female students highlighted the poor condition of the Karjat–Kondhivade road
Raigad Politics : गोगावलेंचं टेन्शन वाढलं? कट्टर विरोधकाला तटकरेंकडून राजकीय बळ; महिला नेत्याची मोठ्या पदावर नियुक्ती

काय होता व्हिडिओ?

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल नेहा आणि ज्योत्स्ना या दोन शाळकरी मुलींनी एक व्हिडिओ बनवला होता. या शाळकरी मुलींनी हातातल्या छत्रीलाच माईक बनवून रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. तर रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बोलताना “हा रस्ता द्रुतगती महामार्गासारखा असून येथून अशा गाड्या जातात की पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा. रिपोर्टर नेहा घारेसह कॅमेरामन मानसी पवार” असं म्हणत जसे पत्रकार ग्राउंड रिपोर्टिंग करतात तशाच पद्धतीने या मुलींनी रिपोर्टिंग केले होते. आता प्रसार माध्यमांसह सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com