Anant Geete
Anant Geete sarkarnama

Anant Geete : पहिल्या फेऱ्यांमध्ये अनंत गिते दिल्लीच्या दिशेने!

Raigad Lok Sabha Constituency : शिवसेनेच्या बालेकिल्याला 2019 मध्ये तटकरेंनी खिंडार पाडले. या निवडणुकीत तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968 मतं मिळाली होती.

Lok Sabha Election : रायगड लोकसभा निवडणुकीच्या निकालच्या पहिल्या चार फेऱ्यांचे निकाल समोर आले आहे. पहिल्या चार ते पाच फेऱ्यांमध्ये अनंत गिते आघाडीवर असून सुनील तटकरे पिछाडीवर आहेत. 2014 मध्ये मोदी लाट असताना भाजप सोबत असलेल्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते हे दोन हजार मतांनी विजयी झाले होते.

शिवसेनेच्या Shivsena बालेकिल्याला 2019 मध्ये तटकरेंनी खिंडार पाडले. या निवडणुकीत तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968, तर गीते यांना 4 लाख 55 हजार 530 मते मिळाली होती. सुनील तटकरेंनी विजय मिळवत 2014 चा बदला घेतला होता.

अनंत गीते हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल झाले. त्यांचा राजकारणातील प्रवास हा मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून सुरू झाला. 1985 ते 1992 ते मुंबई महापालिकेचे नगरसवेक राहिले.

Anant Geete
Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates : हिंगोलीत EVM मशिनमध्ये बिघाड

यातील दोन वर्षे त्यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले होते. पुढे 1996 मध्ये त्यांना खासदारकीची संधी मिळाली. अकराव्या लोकसभेत ते रत्नागिरी मतदारसंघातून पहिल्यादा संसदेत खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग 1998, 1999, 2004 मध्ये ते खासदार म्हणून विजयी झाले होते.

Anant Geete
General Lok Sabha Election 2024 Live Result : 'एनडीए'ने बहुमताचा जादुई आकडा गाठला; 'इंडिया'ची पीछेहाट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com