Shivsena UBT Crises : राजकारणात मोठी घडामोड : राष्ट्रवादीच्या गळाला ठाकरेंचा नेता; राजीनामा देत केली प्रवेशाची केली घोषणा

Shivsena UBT Leader Somnath Ozharde Resigns : महाड विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला असून पक्षाच्या विधानसभा समन्वयकानेच शिवसेनेला रामराम ठोकला आहे.
Shiv Sena Thackeray group
Shiv Sena Thackeray groupSarkarnama
Published on
Updated on

Kokan NCP Politics : रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात कोणत्याच निवडणुका नसताना जोरदार राजकीय घडामोडी होताना दिसत असून, ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती सुरूच आहे. मतदारसंघातील पक्षाचे विधानसभा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच यांनीच पक्षाला रामराम ठोकला आहे. तर पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

नुकताच कोकणातील रस्त्यांवरून बोचरी टीका करत आमदार आदित्य ठाकरे यांनी रायगडचा दौरा केला होता. मुंबई-गोवा महामार्गावरून त्यांनी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावरदेखील निशाणा साधला होता. तसेच जिल्ह्यातील शिवसैनिकांनादेखील कानमंत्र दिला होता.

यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांत नवा उत्साह दिसत असतानाच ठाकरेंना महाड विधानसभा मतदारसंघात जोरदार झटका लागला आहे. येथे विधानसभा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी विधानसभा समन्वयकपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Shiv Sena Thackeray group
Shivsena UBT Crises : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट! 'बंडखोर सहा नव्हे तर सात खासदार', रामदास कदमांचा खळबळजनक दावा

पक्षाशी फारकत घेत त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, ओझर्डे यांनी आपल्या विधानसभा समन्वयकपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनाम्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नंदू शिर्के आणि संपर्कप्रमुख संजय कदम यांना पत्राद्वारे दिली. यावेळी ओझर्डे यांनी पक्षाने तसेच पक्षातील सहकाऱ्यांनी राजकीय आणि सामाजिक वाटचालीत दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.

Shiv Sena Thackeray group
Eknath Shinde Setback : एकनाथ शिदेंच्या हातून धनुष्यबाण जाणार? विधीमंडळगटावर राजकीय पक्षाचेच नियंत्रण, न्यायालयाच्या संकेताना धाकधूक वाढली!

तसेच त्यांनी आपला निर्णय कोणत्याही व्यक्तीविषयी अथवा पक्षाविषयी नाराजी, द्वेष किंवा वैरभावनेतून घेतलेला नसून, जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी घेतल्याचे म्हटले आहे. तर पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगितले आहे. ओझर्डे यांच्या या निर्णयामुळे महाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून, महाडच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com