Sunil Tatkare Setback : शिवसेनेची खेळी, काँग्रेसशी हातमिळवणी; नगराध्यक्ष होताच राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोटो हटवला!

Raigad Mhasla Nagar Panchayat Shivsena Congress Alliance : म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी (ता. ७) दुपारी १२ वाजता विशेष सभेत पार पडली.
Mhasla Nagar Panchayat election; harshwardhan sapkal, bharat gogawale and sunil tatkare
Mhasla Nagar Panchayat election; harshwardhan sapkal, bharat gogawale and sunil tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. म्हसळा नगरपंचायतीवर शिवसेनेने बहुमतासह सत्ता मिळवली

  2. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन केली

  3. राष्ट्रवादी आणि तटकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला

Raigad News : म्हसळा नगर पंचायतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला शह दिला तिथेच राष्ट्रवादीने पक्षांतर करणाऱ्या संबंधित नगरसेवकांवर कारवाई करत शिवसेनेचा टांगा पलटी केला. यामुळे येथे आज गुरुवारी (ता. ७) होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते. ज्यात पुन्हा एकदा शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीने बाजी मारली आहे. पुन्हा एकदा गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने येथे सत्ता प्रस्थापित केली असून म्हसळा नगर पंचायतीवर अखेर भगवा फडकला आहे. तर येथे सत्ता येताच शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या केबिनमधील खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवला. यामुळे मंत्री अदिती तटकरे यांच्यासह खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी (ता. ७) दुपारी १२ वाजता विशेष सभेत पार पडली. यावेळी संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दुपारी १२ वाजल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करत लगेच मतदान प्रक्रिया पार पडली आणि तत्काळ निकाल देखील घोषित करण्यात आला. ज्यात १७ पैकी ९ जागांवर शिवसेनेला बहूमत मिळाले.

तर राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शाहिद जंजिरकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे हे रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना सुनील शेडगे यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप जारी केला होता. तसेच २ दोन दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बंडखोर नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता.

Mhasla Nagar Panchayat election; harshwardhan sapkal, bharat gogawale and sunil tatkare
Raigad Politics : शिवसेना-राष्ट्रवादी वाद मिटला? शिंदेंच्या आमदाराकडून तटकरेंचा उल्लेख 'साहेब'; पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार?

गेल्या दहा वर्षांपासून म्हसळा नगर पंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता होती. पण चार महिन्यांपूर्वी नगराध्यक्षासह सहा नगरसेवकांनी पक्षांतर करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने येथे सत्ता प्रस्थापित केली. तटकरेंच्या सत्तेला सुरूंग लावण्याचे काम गोगावलेंनी केले होते. मात्र या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने संबंधित नगरसेवकांवर कारवाई करत त्यांची सदस्यता रद्द केली होती. यामुळे शिवसेनेसह गोगावलेंना तटकरेंनी जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात होते.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तांतरानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या केबिनमधील खासदार सुनिल तटकरे यांचा फोटो हटवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे फोटो लावले. तर आता या विजयाने राष्ट्रवादीला गोगावले यांच्याकडून धोबीपछाड मिळाला असून निकालानंतर शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.

दरम्यान एकीकडे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील विकोपाला गेलेला सत्तासंघर्ष थांबला असून, आजच्या निकालाने राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. तसेच नगर पंचायतीतील आजचा निकाल आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरणारा असून शिवसेना काँग्रेस अशी युतीचा नवीन समीकरणे तयार झाली आहेत. सध्याच्या शिवसेनेकडे १० नगरसेवकांचे संख्याबळ असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सहा नगरसेवक आहेत.

Mhasla Nagar Panchayat election; harshwardhan sapkal, bharat gogawale and sunil tatkare
Raigad Politics : गोगावले विरूद्ध तटकरे असा सामना रंगलेल्या म्हसळा नगरपंचायतीत निवडणूक; नगराध्यक्ष निवडीनं समीकरणे बदलणार?

FAQs :

1. म्हसळा नगरपंचायतीत कोणाला बहुमत मिळाले
शिवसेनेला 17 पैकी 9 जागांवर बहुमत मिळाले

2. सत्ता कोणाच्या आघाडीने स्थापन झाली
काँग्रेस आणि शिवसेना आघाडीने सत्ता स्थापन केली

3. या निकालाचा कोणाला धक्का मानला जातो
सुनील तटकरे आणि आदिती तटकरे गटाला धक्का मानला जातो

4. ही निवडणूक कुठे झाली
रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत

5. या निकालामुळे काय बदल होऊ शकतात
रायगडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com