NCP Politics : सुनील तटकरेंनी आमदारकीचा शब्द देताच सुधाकर घारेंचा कॉन्फिडन्स भलताच वाढला; थेट शिवसेनेसोबत युती संपुष्टात आणण्याची भाषा

Sudhakar Ghare Signals BJP Alliance And Targets Mahendra Thorve : राष्ट्रवादी काँग्रेसने खोपोली येथे राजकीय शक्तिप्रदर्शन करत शिंदेसेनेसह विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता. याच सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर शिंदेंच्या शिवसेनेला इशारा देण्यात आला आहे.
Raigad Khopoli Politics Sudhakar Ghare BJP Alliance Shivsena MLA Mahendra Thorve
Raigad Khopoli Politics Sudhakar Ghare BJP Alliance Shivsena MLA Mahendra ThorveSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्जत-खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिल्यानंतर राष्ट्रवादीनेही खोपोलीतील पक्षप्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. मात्र, या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केलेल्या विधानामुळे रायगडमधील महायुतीच्या राजकीय गणितांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने मंगळवारी (२४ नोव्हेंबर) खोपोली येथे पक्षाचा संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या मेळाव्यात सुधाकर घारे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधत आगामी निवडणुकीतील पक्षाच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले. एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदराची भूमिका कायम असली, तरी कर्जत-खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्यामुळे महायुतीसोबत राहणे शक्य नसल्याचे घारे यांनी स्पष्ट केले.

Raigad Khopoli Politics Sudhakar Ghare BJP Alliance Shivsena MLA Mahendra Thorve
NCP Politics : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा राजीनामा, पक्षाने जाहीर केली भूमिका; स्पष्टच सांगितले, 'त्या' ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स...

आगामी निवडणुकीत भाजप आपला मोठा भाऊ असेल, अशी भूमिका मांडत भाजपसोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. भाजपच्या नेतृत्वाशी याबाबत चर्चा करून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची भूमिका ठरवली जाईल, असे घारे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जत-खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली असून, शिंदेंच्या शिवसेनेला या समीकरणातून दूर ठेवण्याचे संकेत मिळत असल्याचे राजकीय निरीक्षक मानत आहेत.

दरम्यान, खोपोली नगरपालिकेच्या कारभारावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले. माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खोपोली नगरपालिकेत १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचा आरोप केला. या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आगामी अधिवेशनात आमदार अनिकेत तटकरे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नगरपालिकेच्या कारभाराबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही नाराजी व्यक्त केली. खोपोली नगरपालिका एकेकाळी आर्थिकदृष्ट्या सक्षम होती आणि त्या काळात माजी आमदार सुरेश लाड तसेच माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा कारभार झाला. त्या काळात आपणही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील नगरपालिकेच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने ही बाब दुर्दैवी असल्याचे तटकरे म्हणाले. कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत राजकीय जवळीक वाढवण्याचे संकेत देत असतानाच, सुनील तटकरे यांनी खोपोली नगरपालिकेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भाजपला घेरण्याची भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेला हा संघर्ष आगामी निवडणुकांमध्ये कोणते वळण घेणार, याकडे आता रायगडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Raigad Khopoli Politics Sudhakar Ghare BJP Alliance Shivsena MLA Mahendra Thorve
NCP Politics : यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकत्र; राजकीय चर्चांना उधाण

या पक्षप्रवेश सोहळ्यात खोपोली आणि खालापूर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमातून राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला असून, कर्जत-खालापूरमधील आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.