Raigad Politics : शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष पेटणार? कॅबिनेट मंत्र्याचा सुनील तटकरेंना इशारावजा सल्ला; शिंदेंकडेही तक्रार, 'तटकरेंना आवारा नायतर...'

Raigad Mahayuti Tensions Rise Over Raigad Dispute : रायगड जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद काही केल्या शांत होताना दिसत नाही. अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात थेट तक्रार केली आहे.
Raigad Shivsena NCP Political Conflict; Bharat Gogawale, Mahendra Thorve, Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Raigad Shivsena NCP Political Conflict; Bharat Gogawale, Mahendra Thorve, Mahendra Dalvi And Sunil TatkareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणल्याचा दावा केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. या कथित क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. या क्लिपवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चा सुरू असतानाच रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वादात आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करावा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना संयम बाळगण्यास सांगावे, अशी मागणी पुढे येत आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे. मंत्री भरत गोगावले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असले, तरी दोन्ही बाजूंमधील वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नसल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी हे सातत्याने तटकरेंवर टीका करत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे आणि रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हेही आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Raigad Shivsena NCP Political Conflict; Bharat Gogawale, Mahendra Thorve, Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Raigad Politics : तटकरेंची राजकीय खेळी, शिंदेंच्या शिलेदाराला जोरदार धक्का; शिवसेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांचा NCP त प्रवेश

या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर नियंत्रण ठेवण्याची मागणी शिवसेनेच्या काही नेत्यांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी भरसभेत मंत्री भरत गोगावले यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. तटकरेंना आवर घातला नाही, तर आपणही महेंद्र दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून ‘करेक्ट कार्यक्रम’ करू, असा इशाराही थोरवे यांनी दिला होता.

संजय शिरसाटांचा तटकरेंना इशारावजा सल्ला

आता शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही रायगडमधील राजकीय संघर्षावर भाष्य केले आहे. रायगड जिल्ह्यातील हा वाद अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगत त्यांनी महायुतीतील समन्वयाचा मुद्दा उपस्थित केला. मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे स्थानिक सहकारी यांनी महायुतीत मतभेद निर्माण होऊ नयेत, यासाठी नेहमीच संयम आणि समन्वयाची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे सुनील तटकरे यांनीही समजूतदारपणा दाखवून संयम राखावा, अशी अपेक्षा शिरसाट यांनी व्यक्त केली. यापुढेही हा वाद असाच सुरू राहिला, तर संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो आणि त्याचे राजकीय पडसाद उमटू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे रायगडमधील शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

रामदास कदमांच्या भूमिकेचे शिरसाटांकडून समर्थन

दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम पक्षात एकटे पडल्याच्या तसेच पक्षात अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चांवरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षात कोणतेही मतभेद किंवा अंतर्गत फूट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी रामदास कदम यांच्या भूमिकेची दखल घेतली आहे. पक्षातील ज्येष्ठ आणि जबाबदार नेते म्हणून पक्षाची तसेच जनतेची भूमिका मांडण्याचा कदम यांना पूर्ण अधिकार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

Raigad Shivsena NCP Political Conflict; Bharat Gogawale, Mahendra Thorve, Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Raigad Politics : रायगडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी! NCP नेत्याला संपवण्याची धमकी? बैलमारेंच्या आरोपांवर थोरवेंचं स्पष्ट उत्तर

एकीकडे राज्याच्या राजकारणात कथित ऑडिओ क्लिपवरून चर्चा सुरू असताना, दुसरीकडे रायगडमधील महायुतीतील घटक पक्षांमधील संघर्षामुळे राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. आता या वादात एकनाथ शिंदे हस्तक्षेप करणार का आणि शिवसेना-राष्ट्रवादीतील तणाव कमी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com