

रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादामुळे सत्तास्थापनेत पेच निर्माण झाला आहे.
मंत्री भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
raigad News : रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादाचा फटका आता जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या आड येत आहे. येथे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खेळल्याचे बोलले जात आहे. तर या खेळीत ते यशस्वी झाल्याचेही चर्चा भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर होताना दिसत आहे. दरम्यान आता या घोषणेनंतर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आली असून पुन्हा एकदा त्यांनी इशारा दिला आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवरून पेच निर्माण झाला असतानाच भाजपने राष्ट्रवादीशी युतीची घोषणा केली. या घोषणेमुळे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असला तरीही शिवसेनेला महायुतीतील दोन्ही मित्र पक्षांनी डावलल्याची चर्चा येथे आहे. यावरून मंत्री गोगावले यांनी याआधी देखील थेट इशारा दिला होता.
गोगावले यांनी दोन्ही मित्र पक्षांना सत्तेतून डावल्यानंतर भविष्यातील राजकारणावर गंभीर इशारा देताना आगामी लोकसभेसह इतर निवडणुकींचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच राज्याप्रमाणेच रायगड जिल्हा परिषदेमध्ये ही महायुतीने एकत्र येणे आवश्यक आहे. पण विरोधात लढल्याने याचे परिणाम दिसून आले आहेत. एकत्र न आल्यास आमची आवश्यकता नसल्यास भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधान परिषद निवडणुकी करता वेगळा विचार करावा लागेल असे म्हटलं होते.
ज्यानंतर भाजपने आपल्या हालचाली थोड्या शांत केल्या होत्या. तर शिवसेनेनं वाढवल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. तसेच युतीबाबत चर्चा केली होती. पण आता भाजपने केलेल्या घोषणेनंतर ही भेट वाया गेल्याचे दिसत आहे.
आता भरत गोगावले यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, यावेळी त्यांनी येथे जो पेच निर्माण झाला आहे किंवा जे काही बिन्सलं आहे ते भाजपमुळे नाही. तर जिल्ह्यातच युती व्हावी यासाठी वरच्या पातळीवर चर्चा सुरू आहेत. यामुले रायगडचा प्रश्न आता नेत्यांच्या कोर्टात गेला असून तेच यावर निर्णय घेतील असेही गोगावले यांनी म्हटलं आहे.
त्यांनी, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यात जी चर्चा होईल ती आम्हाला मान्य आहे. तर सध्या जी चर्चा समोर येत आहे की सर्वाधिक जागा असणाऱ्या शिवसेनेला विरोधात बसावे लागले त्यावर गोगावले म्हणाले की, असे काहीही नाही. पण याबाबत एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मग तो विरोधी बाकावर बसण्याचा असला तरीही.
जिल्ह्यातील मतदारांनी सर्वाधिक जागा देवून सर्वांना दाखवून दिलं आहे. यामुळे आता बघूया आमचे दोन मित्र पक्ष जर आम्हाला सहकार्य करत असतील तर निर्णय होईल. अन्यथा आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या प्रमाणे आम्ही पुढे जाऊ...
1. रायगड जिल्हा परिषदेत नेमका वाद कशावरून आहे?
शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याच्या चर्चेमुळे वाद निर्माण झाला आहे.
2. भरत गोगावले यांनी काय भूमिका मांडली?
एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
3. शिवसेना विरोधी बाकावर बसणार का?
असा निर्णय घेतला तरी तो मान्य असेल, असे संकेत देण्यात आले आहेत.
4. या वादात राष्ट्रवादीची भूमिका काय आहे?
राष्ट्रवादी आणि भाजप युतीची घोषणा झाल्याने शिवसेनेत नाराजी वाढली आहे.
5. पुढील निर्णय कोण घेणार?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.