Raigad Politics : रायगडच्या सत्तासंघर्षात उदय सामंतांची उडी : गोगावले-तटकरे भांडणात बाजूला राहिलेली शिवसेना पुन्हा सत्तेत बसणार?

Raigad ZP Politics : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्ष कोणाचा हे अद्याप ठरले नसून येथे भाजप-राष्ट्रवादीची युतीचे संकेत मिळत आहेत. यामुळे भाजपचा अध्यक्ष होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Raigad ZP Politics; sunil tatkare uday samant
Raigad ZP Politics; sunil tatkare uday samantsarkarnama
Published on
Updated on
Summary

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात हातमिळवणीची चर्चा सुरू आहे.

सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्लॅन असल्याची चर्चा आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतल्याने नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे.

Raigad News : राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी देखील खलबतं करण्यात येत असून इच्छुकांकडून लॉबिंग केलं जात आहे. अशातच कोकणातील रायगडमध्ये मात्र महायुतीतच तेढ निर्माण झाला असून भाजप आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली आहे. तर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्लॅन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आखल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेत एकीकडे राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करणार असं चित्र असताना शिवसेनेनं नवी चाल खेळली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सत्तास्थापनेत उडी घेत तटकरेंची भेट घेतली आहे. यामुळे येथे नव्या समि‍करणांची चर्चा होताना दिसत आहे.

रायगड जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 59 इतकी असून सर्वाधिक 21 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 16 जागा, भाजप 15 जागा, ठाकरेंची शिवसेना 05 आणि काँग्रेसने 02 जागा जिंकल्या आहेत. एकीकडे बहूमतीसाठी ३० सदस्य हवे असताना शिवसेनेला बहुमतासाठी ९ सदस्यांची गरज आहे. तर हे सदस्य त्यांना मिळू नयेत म्हणून भाजप-राष्ट्रवादीचे सदस्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Raigad ZP Politics; sunil tatkare uday samant
Raigad Politics : ‘फुटायची भीती आहे म्हणून…’ ZP वरून गोगावलेंनी उघड केली महायुतीमधील धास्ती?

भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या घोषणा खासदार तटकरे आणि भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी केली आहे. या घोषणेनंतरच येथे नवा वाद निर्माण झाला असून त्यांना शिवसेनेची गरज नसेल तर आगामी निवडणुकीत शिवसेना याचा नक्की विचार करेल असा गर्भीत इशारा मंत्री भरत गोगावले यांनी दिला. यानंतर आता भाजपने सेफ गेम खेळण्यास सुरूवात केली आहे. तर मंत्री उदय सामंत यांनी सत्ता स्थापनेच्या डावात उडी घेतली आहे.

सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात तटकरे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेच्या चर्चांना वेगळं वळण आले आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसंदर्भात स्थानिक पातळीवर मतभेद निर्माण झाले असून शिवसेनेला सत्तेत सहभागी करून न घेतल्यास याचे परिणाम येत्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. यामुळे सामंत-तटकरे भेटीला महत्त्व प्राप्त झालं असून अंतिम निर्णय नेमका काय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषदेत सध्या काय घडामोडी सुरू आहेत?
अध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.

2. शिवसेनेची भूमिका काय आहे?
सर्वाधिक जागा असूनही शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची चर्चा सुरू आहे.

3. सुनील तटकरे यांची भूमिका काय आहे?
प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी स्पष्ट संकेत दिल्याने महायुतीत तणाव वाढल्याची चर्चा आहे.

4. उदय सामंत यांच्या भेटीचे महत्त्व काय?
त्यांच्या हस्तक्षेपामुळे नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.

5. अंतिम सत्ता कोण स्थापन करणार?
सध्याच्या समीकरणांनुसार भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता जास्त दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com