Alibag : रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज ठाकरे आहेत. अलिबागमध्ये जमीन परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला राज ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते. त्यासाठी गर्दीदेखील झाली होती. मात्र, परिषदेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी आयोजकांना झापले. जी बैठक आपल्या खासगीत घ्यायची होती ती अशी परिषदेचे नाव घेऊन सार्वजनिकपणे घेतल्याने राज ठाकरे भडकले.
रायगड जिल्ह्यातील जमिनी परप्रांतीय अल्पदरात विकत घेत आहेत. त्यात जमिनी विकून इथलाच भूमिपुत्र आपले गाव सोडून दुसरीकडे जात आहेत. जमिनीची विक्री ही पद्धशीरपणे केली जात आहे. त्यातून मराठी माणसाच्या हातातून जमीन जात आहे. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी जमीन परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. जमिनी विकू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी या वेळी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुबईचे उदाहरण देत तेथे व्यवसाय करायचा असेल तर तिथल्याच व्यक्तीला पार्टनर म्हणून घ्यावे लागते. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हीदेखील पार्टनरशीप मागा, असे आवाहन राज यांनी केले. महाराष्ट्रात जे उत्तम ते ओरबडण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे सावध राहा, असा सल्लादेखील राज यांनी दिला. तसेच महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते ओरबडण्याचे काम सुरू असल्याचे सांगत परप्रांतीयांवर हल्ला चढवला.
राज ठाकरे यांनी आपल्या रायगड दौऱ्यात अलिबाग रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. या वेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव उपस्थित होते. महाराष्ट्रातील मराठी मूळ शेतकऱ्याकडे ही जमीन टिकून राहावी, तसेच जमिनीचा जो मोबदला आहे तो सरळ थेट शेतकऱ्यांना मिळावा, अशी मनसेची भूमिका असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.