Rajan Salvi : ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंबरोबर गेलेल्या राजन साळवींची प्रतिष्ठा पणाला! पालिका निवडणुकीत उतरवणार वारसाला?

Ratnagiri Municipal Corporation election : रत्नागिरी महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागली असून इच्छुकांनी तयारीची सुरुवात केली आहे. विशेषतः प्रभाग क्र.14 मध्ये सर्वाधिक चुरस पाहायला मिळतेय. या प्रभागात महायुतीतील अनेक प्रभावी नेते असून माजी आमदार राजन साळवींच्या वारसाची आता चर्चा होताना दिसत आहे.
Rajan Salvi
Rajan Salvi sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र.14 मध्ये सर्वाधिक चुरस पाहायला मिळतेय.

  2. माजी आमदार राजन साळवी यांच्या मुलाचे नाव नगरसेवकपदासाठी चर्चेत आहे.

  3. शिवसेनेच्या प्रतिष्ठेची खरी परीक्षा या प्रभागातून होणार आहे.

Ratnagiri News : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. तळ कोकणात देखील राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे. त्याचपद्धतीने रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीचे पडघम देखील वाजू लागले असून, इच्छुकांनी लॉबिंगला आत्तापासूनच सुरूवात केली आहे. परंतु येथे सर्वांधिक चर्चेला ऊत आला आहे तो प्रभाग क्र.14 मध्ये. येथे महायुतीतील अनेक सक्रिय आणि पक्षात वजन असलेले पदाधिकारी आहेत. त्यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या माजी आमदार राजन साळवी यांचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या वारसदाराचे नगरसेवकपदासाठी येथून नाव चर्चेत येत आहे. त्यामुळे येथे शिवेसनेच्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

शहारतील प्रभाग क्र. 14 हा जुना प्रभाग असून नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनेमध्ये तो प्रभाग 15 झाला आहे. शहरातील आठवडा बाजाराचा डावीकडचा भाग तेळीआळी, चंवडेवठार, घुडेवठार, मांडवी, वेताळपूल आदी भाग या प्रभागामध्ये येतो. बिपिन बंदरकर जेव्हा राष्ट्रवादीत होते तेव्हा 2001 मध्ये ते निवडून आले होते. तेव्हापासून या प्रभागावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वर्चस्व होते.

Rajan Salvi
Rajan Salvi News : 'केसरकर,सामंत मंत्री झाले,पण मी तसाच ...'; साळवींनी शिंदेंसमोरच बोलून दाखवली खंत

राज्यातील राजकीय घडामोडींमुळे आणि पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेली चार वर्षे प्रशासक असल्याने पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. या प्रभागातून यापूर्वी दिवंगत माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, भाऊ संजू साळवी, बिपिन बंदरकर, मुन्ना चवंडे, दादा ढेकणे अशा नेत्यांनी राजकीय वजन तयार केले आहे. राजन साळवी तर आमदार झाले. त्यामुळे हा प्रभाग राजकीयदृष्ट्या अधिक चर्चा आहे.

सध्या महायुतीत भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुती म्हणूनच लढण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

यामुळे येथे जागावाटपाची अद्याप कोणतीच चर्चा नाही. दरम्यान आता आगामी रत्नागिरी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून इच्छुकांनी दंड थोपटण्यास सुरूवात केली आहे. चुरस असणाऱ्या प्रभाग क्र.14 मध्ये महायुतीतील अनेक प्रभावी नेते असतानाच साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना उमेदवारी मिळावी म्हणून लॉबिंग सुरू झाली आहे. त्यामुळे मंत्री उदय सामंत निष्ठावंतांसाठी आयत्यावेळी काय खेळी खेळतात? की, राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या जवळीकचा फायदा घेतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Rajan Salvi
Rajan Salvi News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पाऊल ठेवताच साळवींचा कंठ दाटून आला; म्हणाले, 'आज माझ्या दोन्ही डोळ्यांत...'

FAQs :

प्र.१: रत्नागिरी पालिकेत कोणत्या प्रभागात सर्वाधिक चर्चा आहे?
➡️ प्रभाग क्र.१४ हा सर्वाधिक चर्चेत आहे.

प्र.२: या प्रभागातून कोणाचे नाव चर्चेत आहे?
➡️ माजी आमदार राजन साळवी यांच्या मुलाचे नाव नगरसेवकपदासाठी पुढे येत आहे.

प्र.३: शिवसेनेची प्रतिष्ठा का पणाला लागली आहे?
➡️ कारण या प्रभागात महायुतीतील अनेक सक्रिय नेते स्पर्धेत आहेत आणि प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com