Municipal Election : कोकणात युती की आघाडी सस्पेन्स वाढला? नेत्यांकडून पत्नीची वर्णी लावण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी

Mahayuti Vs MVA : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यासाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांनी कंबर कसली आहे.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVAsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अजूनही संभ्रमावस्था असून उमेदवार निवडीवरून गोंधळ निर्माण झाला आहे.

  2. शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजप आणि काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी असून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता वाढली आहे.

  3. हिरवा कंदील मिळालेल्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून उर्वरितांचे राजकीय गणित अजून ठरत नाही.

Rajapur Municipal Election : राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील अनेक भागात महायुती आणि महाविकास आघाडीबाबत संभ्रमावस्था असून अशीच स्थिती कोकणातही आहे. यामुळे सध्यातरी इच्छुकही संभ्रमात असून ते युती आणि आघाडी होणार का याकडे लक्ष देवून आहेत. पण यामुळे आता इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पुढे येताना दिसत आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी राजापूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीबाबत संभ्रमावस्था असली तरीही शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुकांचा कल अधिक दिसत आहे. पण या पक्षांतून उमेदवारी न मिळाल्यास त्यातून नाराजी अन् बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता असून याचा राजकीय पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान सध्या ज्या इच्छुक उमेदवारांना पक्षांकडून लढण्यासाठी हिरवा कंदील मिळालेला आहे त्या उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर उर्वरितांची घालमेल वाढलेली दिसून येत आहे. अशातच उद्यापासून खऱ्या अर्थाने निवडणुकीचे पडघम वाजू लागणार असून, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVA : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होणार 'बिगफाईट', जिल्हा परिषदेतही उडणार धुरळा

राजापूरमध्ये 10 प्रभागातील 20 जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी आरक्षण निश्‍चित करताना पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर नगराध्यक्षपदही महिलांसाठी आरक्षित झाले आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या आरक्षणाप्रमाणे उमेदवारी निवड करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत.

चार वर्षानंतर या निवडणुका होत असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. जिथे महिला आरक्षण आहे तिथे नेत्यांकडून पत्नीची वर्णी लावण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करताना दिसत आहेत. ही स्थिती असली तरीही महाविकास आघाडी वा महायुती निश्‍चितीसाठी मित्रपक्षांच्या बैठका होत नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे.

महाविकास आघाडी वा महायुती होण्याचे संकेत मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दिले जात आहेत. महाविकास आघाडी वा महायुतीच्या अधिकृत शिक्कामोर्तब झाल्यानंतर, जागावाटप आणि उमेदवारी निश्‍चिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी वा महायुतीमध्ये जागावाटपामध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे. त्यानंतर, आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर उमेदवार निवड करताना मित्रपक्षांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्याच्यातून रंगणाऱ्‍या नाराजी नाट्यातून बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mahayuti Vs MVA
Mahayuti vs MVA : महायुती अन् महाविकास आघाडीच भवितव्य मुंबई ठरवणार? भाजप, ठाकरे शिवसेना, मनसेची रणनीती काय असणार?

FAQs :

1. राजापूर नगरपालिकेत महायुती आणि महाविकास आघाडीची स्थिती काय आहे?
दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवार निवडीवर संभ्रम असून जागा वाटपावर एकमत झालेले नाही.

2. कोणते पक्ष या निवडणुकीत सक्रिय आहेत?
शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत.

3. उमेदवारी न मिळाल्यास काय परिस्थिती उद्भवू शकते?
उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

4. कोणत्या उमेदवारांना हिरवा कंदील मिळालेला आहे?
काही प्रमुख इच्छुकांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

5. या परिस्थितीचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
बंडखोरीमुळे आघाड्यांच्या मतविभाजनाची शक्यता असून निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com