एबी फॉर्ममध्ये सौदेबाजी? उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांचा खळबळजनक आरोप; आमदार अशोक पाटील यांचीही कबुली

Ramdas Kadam exposes AB form deal at matoshree : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Uddhav Thackeray, Anil Parab and Ramdas Kadam
Uddhav Thackeray, Anil Parab and Ramdas Kadamsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. रामदास कदम यांनी खेड येथील नाट्यगृह उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर थेट एबी फॉर्मच्या सौद्याचा गौप्यस्फोट केला.

  2. आमदार अशोक पाटील यांनी “हो, सौदा झाला” अशी थेट कबुली दिली, ज्यामुळे सभा क्षणातच राजकीय स्फोटात रूपांतरित झाली.

  3. कदम यांनी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर षडयंत्र रचल्याचा आरोप करत योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न झाल्याचेही सांगितले.

Ratnagiri News : जिल्ह्यातील खेड येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात कदम यांनी योगेश कदम यांच्या करण्यात आलेल्या आरोपांवर जोरदार टीका केली. तसेच शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखन करताना तुमच्या मंत्री पदाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली. आता याच कार्यक्रमात रामदार कदम यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Ramdas Kadam exposes AB form deal involving Ashok Patil and accuses Uddhav Thackeray and Anil Parab of political sabotage at Khed event in Ratnagiri)

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करताना, ठाकरेंनी एबी फॉर्म देताना सौदेबाजी केली असा आरोप केला आहे. तर यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार अशोक पाटील यांनाच हा प्रश्न केला. ज्यावर पाटील यांनी ‘हो’ असे उत्तर दिलं आहे. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Uddhav Thackeray, Anil Parab and Ramdas Kadam
Ramdas Kadam यांनी Uddhav Thackeray यांची सापाशी तुलना का केली ? कदम काय म्हणाले ? | Mumbai News |

मंत्री योगेश कदम यांना वाळूतील भ्रष्टाचार आणि सावली बार प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी घेरले होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील राजीनाम्याची मागणी केली होती. ज्यानंतर रामदार कदम यांनी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता.

यानंतर आता रामदार कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एबी फॉर्म चा सौदा केल्याचा आरोप केला आहे. तसेच ठाकरेंवर बोचरी केली. यावेळी कदम यांनी आमदार अशोक पाटील यांचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, आमचे मुलुंडचे आमदार अशोक पाटील हे कोळी समाजाचा चेहरा आहेत. गेल्या वेळी त्यांना ठाकरेंनी निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिला. पण काहीच वेळाच त्यांना फोन आला आणि कळलं की त्याच एबी फॉर्मसाठी एवढे तिकडून मिळाले एवढे आले. त्यामुळे तो फॉर्म काढून घेतला. हे खरं की खोट सांगा. यावर व्यासपीठावरच अशोक पाटील क्षणार्धात हो झाला सौदा असे म्हणत कबुली दिली. तर हेच वास्तव आहे, हेच मातोश्रीच वास्तव आहे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर कदम यांनी निशाणा साधला.

खोटे- नाटे आरोप करण्याचे षडयंत्र

उद्धव ठाकरेंनी अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत योगेश कदम असो किंवा इतर शिवसेनेचे मंत्री त्यांच्या खोटे- नाटे आरोप करण्याचे काम सुरू केलं आहे. माझ्याच भावाला संजय कदम याला मागील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या बेडकाने एबी फॉर्म दिले. योगेश कदम याला संपवण्याचा प्रयत्न केला. आता संजय कदम स्वगृही परतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांचे राजकारण फार चालणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Uddhav Thackeray, Anil Parab and Ramdas Kadam
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : 'शिंदेंना मुख्यमंत्री करायचं ठरलं, अन् इकडं बाप-लेकानं..'; रामदास कदमांनी इतिहास काढला!

FAQs :

प्रश्न 1: रामदास कदम यांनी एबी फॉर्म प्रकरणात नेमका काय आरोप केला?
उत्तर: त्यांनी आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म विकला आणि त्याच्या बदल्यात आर्थिक सौदे झाले.

प्रश्न 2: अशोक पाटील यांनी काय कबूल केलं?
उत्तर: व्यासपीठावरच पाटील यांनी कबूल केलं की, “हो, सौदा झाला.”

प्रश्न 3: अनिल परब आणि संजय कदम यांच्या नावांचा उल्लेख का झाला?
उत्तर: कदम यांच्या मते, अनिल परबच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी संजय कदम यांना एबी फॉर्म देऊन योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा डाव रचला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com