Kalyan Loksabha News : जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले, त्यांना पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली अन॒...

Kalyan Loksabha कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
Jitendra Awhad, Eknath Shinde
Jitendra Awhad, Eknath Shindesarkarnama

Dombivali News : भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवले आहे. कल्याण, डोंबिवलीत भाजप उतरायला तयार नाही आणि ठाण्यात आम्हाला सीट पाहिजे याचा दबाव कायम ठेवलाय. तुमचा वापर केला जाणार होता हे तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान्न होते. ज्या घरात सोन्याच्या ताटात बसून जेवत होते. तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा निर्माण झाली. तुम्ही वाटोळे करून घेतलं, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर केली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

आव्हाड म्हणाले, शरद पवारांच्या मृत्यूची प्रार्थना करतायेत, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राजकीय विरोध असू शकतो, पण कोणाच्या मरणाची इच्छा व्यक्त करणे याच्या सारखं खालच्या दर्जाचा विचार असू शकत नाही. भाजपच्या 15 खासदारांनी स्टेजवर बोलताना संविधान बदलून टाकणार असे बोलले त्यानंतर हे सगळं अंगावर येतेय असं दिसल्यानंतर पुन्हा माघार घेतली.

Jitendra Awhad, Eknath Shinde
Kalyan Lok Sabha News : दरेकरांचे टेन्शन वाढले; उमेदवारी अर्ज दाखल करताच डोंबिवलीत ठाकरे गटात वादाचा भडका

इलेक्ट्राेल बॉण्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आग्रही भूमिकेमुळे भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार बाहेर आला. लोकांचा मृत्यू झाला तरी चालेल आम्हाला इलेक्शन लढवायला पैसे द्या. 4 हजार 800 कोटी त्यांच्या बँकेत आहेत. बोरिवली- ठाणे बोगदा, समृद्धी हायवेवरील एक रस्ता पंधराशे कोटींचा, दुसरा रस्ता सोळाशे कोटींचा, 31 हजाराच्या अगेन्स मेगा इंजिनिअरिंगने एक हजार कोटी रुपये दिले, असा आरोप करत 'धंदा लो चंदा लो' हा धंदा चालू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे बोलायला कोणतेच विषय नाहीत. हे भटकती आत्मा, मंगळसूत्र,असे विषय निघत आहेत. मणिपूरच्या वेळेस मंगळसूत्र आठवले नाही का ? असं अचानक तुम्हाला स्त्रीपण आठवलं, असे सवाल करत वैयक्तिक बोलणार नाही पण स्त्री प्रेमावर बोलायचा अधिकार कोणाला असतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

Edited By : Umesh Bambare

R

Jitendra Awhad, Eknath Shinde
Jitendra Awahad News : जितेंद्र आव्हाड म्हणाले; '... तर पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com