Uday Samant : महायुती तुटता तुटता राहिली! पालकमंत्री सामंत यांची परफेक्ट 'टायमिंग' अन्'सटलमेंट'; प्राजक्ता रूमडेंना मिळणार मोठं गिफ्ट अन्....

Mahayuti Politics : जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला असून आता माघारीची डेडलाईनही संपली आहे.
Mahayuti Politics; Uday Samant
Mahayuti Politics; Uday Samantsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रत्नागिरीत तीन अपक्ष उमेदवारांनी चर्चा करून अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.

  2. प्राजक्ता रूमडे यांच्या समाजकार्यातील सक्रिय भूमिकेमुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा शब्द देण्यात आला आहे.

  3. महायुतीच्या रणनीतीनुसार अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध निवडणुकीची शक्यता वाढली आहे.

Ratnagiri News : आगामी रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेनेने कंबर कसली असून पालकमंत्री उदय सामंत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परफेक्ट टायमिंग साधत योग्य सटलमेंट घडवून आणत महायुतीचे टेन्शन कमी केले आहे. सध्या या परफेक्ट टायमिंग आणि सटलमेंटची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुका होत असून माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेल्या 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तसेच नगरसेवकपदाच्या 81 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. ज्यात रत्नागिरीतील तीन उमेदवारांचा समावेश असून या माघारीने महायुती अजून भक्कम झाली आहे. तर या माघारीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी उमेदवारांची मनधरणी केल्याची आता चर्चा आहे.

रत्नागिरी नगरपालिकेत महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना-भाजप यांच्यात समेट झाली असून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर रिंगणात ठाम आहे. राष्ट्रवादी वेगळी लढण्यामागे अल्पसंख्याक मतांचे विभाजन ही राजकीय खेळी असल्याची सध्या चर्चा असून नाराजांसह दाखल अपक्षांमुळे महायुतीत वाढलेले टेन्शन कॅश करण्याची रणनीती असल्याचेही बोलले जात आहे.

Mahayuti Politics; Uday Samant
Uday Samant : शिवसेनेच्या नाराजी नाट्यात ट्विस्ट! दिल्लीत शिंदेंची शाहांकडे तक्रार, राज्यात सामंतांनी गायले रवींद्र चव्हाणांचे गोडवे

यादरम्यान रत्नागिरीत महायुतीचे प्रामाणिक काम सुरू आहे. तीन अपक्षांनी चर्चेनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी प्रभाग 6 मधून प्राजक्ता रूमडे, प्रभाग 1 मधून श्रेया शिंदे आणि प्रभाग 10 मध्ये विभव पटवर्धन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे या प्रभागांमध्ये महायुती भक्कम झाली आहे. प्राजक्ता रूमडे अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा शब्द दिल्याचीही चर्चा येथे आहे.

यावेळी सामंत म्हणाले, भाजप-शिवसेना महायुतीमध्ये एक धोरण निश्चित झाले आहे. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल तेथे शिवसेनेचे अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतील आणि शिवसेनेच्या उमेदवार असेल तर भाजपाचे अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतली. त्यानुसार आजच प्रभाग 6 मधून रूमडे, प्रभाग 1 मधून श्रेया शिंदे आणि प्रभाग 10 मध्ये विभव पटवर्धन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

प्रभाग 6 मधून नीलेश आखाडेलाही अर्ज मागे घेण्याबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध येतील, अशी परिस्थिती आहे. महायुतीच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवकांचा कोटा येणार आहे. त्यापैकी दोन शिवसेनेकडे आणि 1 भाजपला दिले जाणार आहे. त्यामध्ये प्राजक्ता रूमडे यांना स्वीकृत नगरसेवकपद दिले जाणार असल्याचा शब्द देण्यात आला आहे.

Mahayuti Politics; Uday Samant
Uday Samant : 'अंधारे ताईंच्या विनोदाला दाद देतो!' उपमुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेवर उदय सामंतांचा मोठा खुलासा!

FAQs :

1. रत्नागिरीत कोणत्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले?
प्रभाग 6 मधून प्राजक्ता रूमडे, प्रभाग 1 मधून श्रेया शिंदे आणि प्रभाग 10 मधून विभव पटवर्धन यांनी अर्ज मागे घेतले.

2. प्राजक्ता रूमडेंना कोणते पद देण्याचा शब्द देण्यात आला?
त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

3. महायुतीला या माघारीमुळे काय फायदा झाला?
या प्रभागांमध्ये महायुतीची स्थिती भक्कम झाली असून बिनविरोधाची शक्यता वाढली आहे.

4. ही माहिती कोणी दिली?
शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

5. महायुतीचे प्रभाग कोणते मजबूत झाले?
प्रभाग १, ६ आणि १० मध्ये महायुती अधिक सक्षम झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com