

Pune News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडणार आहे. असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा आहे आणि त्यांच्यासोबत काही नाराज मंत्री देखील असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा असणारे उदय सामंत आपल्या जवळचा गट घेऊन कदाचित भाजपसोबत जातील अशी शक्यता आहे. त्यात काय प्रोब्लेम आहे? कारण आता संदीपान भुमरे, संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले त्रस्त झालेली नेते आहेत. निश्चितपणे या सगळ्यांचा शिंदे यांच्यापेक्षा उदय सामंत यांच्याकडे कल असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल जो रंजकपट 2022 ला शिंदेंनी नाटकाचा पहिला अंक दाखवला होता, त्याचा दुसरा अंक आता सुरु आहे", असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
याबाबत पुण्यामध्ये बोलताना उदय सामंत, या ज्या काही चर्चा सुरू आहेत. त्या जगातला आजचा सर्वात मोठा हा विनोद आहे. जो आज सुषमा अंधारे यांनी केला आहे. मी अनेक वेळा सांगितलं आहे की, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. आणि एकनाथ शिंदे यांनी मला उद्योग मंत्री म्हणून संधी दिली आहे याचीही जान आहे.
काही लोकांच्या पोटामध्ये पोटशुळ आहे. मी महाराष्ट्रमध्ये फिरतो आणि एकनाथ शिंदेंचा सहकारी म्हणून फिरतो. या पोटसुळा पाही या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे अंधारे ताईंनी केलेला जो विनोद आहे त्याला मी दाद देतो.
कारण वर्ष संपता संपता हा या वर्षीचा सर्वात मोठा विनोद आहे. मात्र माझा नाव घेऊन त्यांना टीआरपी मिळत असेल तर यात माझा काय दोष. परंतु मला माझ्या मर्यादा माहित आहे. सुषमा अंधारे माझ्या बहिणीसारखे आहेत एखाद्याचा पॉलिटिकल करिअर बरबाद करणं ज्या काही गोष्टी होतात त्यांनी त्या करू नये. असं उदय सामंत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.