Uday Samant : शिवसेनेच्या नाराजी नाट्यात ट्विस्ट! दिल्लीत शिंदेंची शाहांकडे तक्रार, राज्यात सामंतांनी गायले रवींद्र चव्हाणांचे गोडवे

Uday Samant Praises Ravindra Chavan : दिल्लीत एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कारभाराविरोधात तक्रार करत असतानाच राज्यात मात्र त्यांचा शिलेदार रवींद्र चव्हाणांचे गोडवे गात असल्याचे समोर आले आहे.
Uday Samant And Ravindra Chavan
Uday Samant And Ravindra Chavansarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांचे कौतुक करत त्यांना पद व मनाने मोठे नेता असल्याचे म्हटले.

  2. रत्नागिरीतून सुरू झालेल्या युतीच्या प्रचाराबद्दलही सामंतांनी चव्हाण यांचे आभार मानले आणि युती टिकवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

  3. त्याचवेळी शिंदेंनी अमित शाहांकडे तक्रार केल्याची चर्चा सुरू असल्याने सामंतांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वाढले.

Ratnagiri News : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असून नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पळवापळवी आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. तर भाजपने तर ऑपरेश लोटस राबवून हा ही माझा अन् तोही माझा म्हणत मित्र पक्ष असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच खिंबार पाडणे सुरू केले आहे. यावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जावून अमित शाह यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वापरत असलेल्या पॉलिसीवर बोट ठेवल्याचे माहिती मिळत असल्याचे राज्यात खळबळ उडाली असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी चव्हाण यांचे कौतुक केले आहे. याच कौतुकामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

दिल्लीत एकीकडे एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्या कारभाराविरोधात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रारी केल्या जात असताना दुसरीकडे रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कौतुक केले आहे. सामंत म्हणाले, कोकणातील एक सहकारी जगातील मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बसला याचा आम्हाला अभिमान आहे.

शिवसेनेचे नेते कुमार निकम यांनाही याचा अभिमान वाटत असल्याचे सामंत यांनी नमूद केले. केवळ युती करणे महत्त्वाचे नाही, तर ती टिकली पाहिजे आणि प्रत्येक नगरपालिका-नगरपरिषदेवर तिचा प्रभाव पडला पाहिजे, असेही ते म्हणाले. रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रातला पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याचे सांगत सामंत यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Uday Samant And Ravindra Chavan
Uday Samant : 'दादांनी उमेदवार पळवला' आरोपावर उदय सामंतांचं 'खणखणीत उत्तर': म्हणाले,'उमेदवार पळवला, म्हणून...'

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील महायुतीच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी कोकणातील एक सहकारी जगातील मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बसला, याचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हणाले. तसेच फक्त युती केली म्हणजे नाही तर ती युती टिकवण्यासाठी राज्यातील प्रत्येक नगरपालिका आणि नगरपंचायतीवर प्रभाव पडला पाहिजे या भावनेतून महाराष्ट्रातील पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल त्यांनी चव्हाण यांचे आभार मानले.

नुकतीच शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे चव्हाण यांच्याविरोधात दिल्लीत जावून तक्रार केली होती. तर दुसरीकडे उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांचे तोंड भरून कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

दरम्यान भाजपच्या ऑपरेश लोटसवरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबात मोठा दावा केला आहे. सामंत यांना उपमुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा आहे आणि त्यांच्यासोबत काही नाराज मंत्री देखील असल्याचा दावा केला आहे. अंधारे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा असणारे उदय सामंत आपल्या जवळचा गट घेऊन कदाचित भाजपसोबत जातील अशी शक्यता असून संदीपान भुमरे, संजय शिरसाट, दादा भुसे आणि भरत गोगावलेही त्रस्त झालेले नेते आहेत.

म्हणूनच या सगळ्यांचा शिंदेंपेक्षा उदय सामंत यांच्याकडे कल अधिक असावा. यामुळे आगामी काळात राजकारणातल जो रंजकपट 2022 ला शिंदेंनी नाटकाचा पहिला अंक दाखवला होता, त्याचा दुसरा अंक आता सुरु आहे", असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. ज्यावर पलटवार करताना सामंत यांनी जगातला आजचा सर्वात मोठा विनोद हा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

मी अनेक वेळा सांगितलं आहे की, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी मला उद्योग मंत्री म्हणून संधी दिली आहे याचीही जान आणि भान असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर अंधारे ताईंनी केलेला जो विनोद आहे त्याला आपण दाद देतो, असे म्हणत सामंत यांनी पलटवार केला आहे.

Uday Samant And Ravindra Chavan
Uday Samant : 'अंधारे ताईंच्या विनोदाला दाद देतो!' उपमुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेवर उदय सामंतांचा मोठा खुलासा!

FAQs :

1. उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांबद्दल काय म्हटले?

ते पदाने आणि मनाने मोठे असून त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करावे असे सामंत म्हणाले.

2. रत्नागिरीत युतीचा प्रचार कोणी सुरू केला?

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीचा पहिला प्रचार सुरू केला.

3. शिंदे यांनी अमित शाहांकडे तक्रार केली का?

याबाबत चर्चा सुरू असली तरी अधिकृत पुष्टी नाही.

4. सामंतांच्या विधानामुळे राजकीय चर्चा का वाढल्या?

कारण शिंदे–भाजप तणावाच्या चर्चेदरम्यान अचानक चव्हाणांचे कौतुक करण्यात आले.

5. युती टिकावी असे सामंत का म्हणाले?

स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारण स्थिर ठेवण्यासाठी युती टिकणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com