Ratnagiri Election Results : रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या वादळात विरोधकांचा पालापोचाळा; केवळ राजापूरमध्ये माजी आमदाराने काँग्रेसला तारले

Congress Vs Mahayuti : महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमधील 246 नगरपरिषद जागांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आली. या निवडणुकांसाठी आज रविवारी निकाल लागत असून कोकणात महायुतीचा झंझावात दिसत आहे.
Assembly Election Results
Assembly Election ResultsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जिल्ह्यातील चार नगरपरिषद व तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांत महायुतीने मोठे यश मिळवले आहे.

  2. सातपैकी सहा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगराध्यक्ष पदावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

  3. राजापूर नगरपरिषदेवर माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवत काँग्रेसला दिलासा दिला आहे.

Ratnagiri News : जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींमधील झालेल्या निवडणुकीचा अखेर निकाल लागला असून महायुतीने विरोधकांची धुळधान केली आहे. जिल्ह्यातील सात पैकी सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष पदावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राजापूर नगरपरिषदेवर विधानपरिषदेच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवत काँग्रेसला तारले आहे.

जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील एकूण चार नगरपरिषदांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले असून दोन नगरपंचायतींवर भाजपने तर एका नगरपरिषदेवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेवर शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांनी विजय मिळवला असून चिपळूण नगरपरिषदेत उमेश सकपाळ तर खेड नगरपरिषदेत माधवी बुटाला यांनी शिवसेनेतर्फे बाजी मारली आहे. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे.

जिल्ह्यातील नगरसेवकांच्या १५१ जागा आणि सात नगराध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. यावेळी जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यांच्यामधील वर्चस्वाची लढत पहायला मिळावी. तर नुकताच झालेल्या पक्षप्रेशामुळे येथे बंडखोरी वाढली.

Assembly Election Results
Bhugur Election Result : भगूरमध्ये शिवसेनेच्या करंजकरांची २५ वर्षांची सत्ता उलथवली, राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी..

त्यातच अपक्षांच्या वाढलेल्या संख्येमुळे निकालाची उत्सुकता शिंगेला पोहचली होती. रत्नागिरीनगर परिषदेत 32 पैकी 29 जागांवर शिवसेना-भाजप युतीचा विजय झाला असून केवळ तीन जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विजय मिळवता आला आहे. तर येथे एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादीतील एका गटासह काँग्रेसला विजयाचे खातेही उघडता आलेले नाही.

नगरपंचायतींच्या निकालांकडे पाहता, लांजा नगरपंचायतीत शिवसेनेच्या सावली कुरुप विजयी झाल्या आहेत. देवरुख नगरपंचायतीत भाजपच्या मृणाल शेट्ये तर गुहागर नगरपंचायतीत भाजपच्या निता मालप यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. राजापुरात महायुतिला नगराध्यक्ष पद मिळविता आले नाही, मात्र इतर सहा ठिकाणी महायुतिने वर्चस्व राखण्यात यश मिळविले आहे. या निकालांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतिमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रत्नागिरीचा निकाल

रत्नागिरी नगरपरिषद -

नगरसेवक जागा 32 बलाबल 6 भाजप, 3 उद्धव ठाकरे सेना, 23 शिवसेना आणि नगराध्यक्ष पदावर शिल्पा सुर्वे विजयी (शिवसेना)

खेड नगरपरिषद -

नगरसेवक 20 जागा- 17 शिवसेना तर 3 भाजप

चिपळूण नगरपरिषद-

नगरसेवक 28 जागा - (शिवसेना 9 , भाजप 8, उद्धव ठाकरे सेना 5, काँग्रेस आय 3, राष्ट्रवादी अजित पवार 2, राष्ट्रवादी शरद पवार 1)

राजापूर नगरपरिषद -

नगरसेवक - 20 जागा (काँग्रेस 7, उद्धव ठाकरे सेना 3, शिवसेना 9 भाजप 1)

लांजा नगरपंचायत

लांजा नगरपंचायतीसाठी नगरसेवक - 17 जागा (शिवसेना 10, भाजप 1, अपक्ष 5, उद्धव ठाकरे सेना 1)

गुहागर नगरपंचायत

गुहागर नगरपंचायतीसाठी नगरसेवक - 17 जागा (शिवसेना 8, भाजप 5, राष्ट्रवादी अजित पवार गट 1, उद्धव ठाकरे सेना 2, मनसे 1)

देवरुख नगरपंचायत

देवरुख नगरपंचायतीसाठी नगरसेवक 17 जागा - (भाजप 3, शिवसेना 3, अजित पवार राष्ट्रवादी 4, अपक्ष 4, उद्धव ठाकरे सेना 3)

Assembly Election Results
Satara Election Results: साताऱ्यातून निकालाची पहिली धक्कादायक अपडेट! अपक्ष उमेदवाराचा दोन्ही राजेंना धक्का, शंकर किर्दत यांनी उधळला गुलाल

FAQs :

1. जिल्ह्यात एकूण किती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या?
चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या.

2. महायुतीने किती नगराध्यक्ष पदे जिंकली?
एकूण सातपैकी सहा नगराध्यक्ष पदांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

3. काँग्रेसला कुठे यश मिळाले?
राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवला.

4. या निकालांचा राजकीय अर्थ काय?
स्थानिक पातळीवर महायुतीची पकड मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

5. हे निकाल आगामी निवडणुकांवर परिणाम करतील का?
होय, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी हे निकाल महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com