Ratnagiri Politics : चार पंचायत समित्यांवर महिलाराज! रत्नागिरीत नेत्यांची डोकेदुखी वाढली! उदय सामंत यांनाही करावी लागणार तारेवरची कसरत

Uday Samant And other political leaders faces political challenge : गेल्या तीन वर्षापासून रखडेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना मुहूर्त लागला आहे. नुकसाच जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी सोडतही काढण्यात आली.
Uday Samant
Uday Samantsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांपैकी चार ठिकाणी महिला सभापतीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

  2. राजापूर (नागरिक मागासवर्ग महिला) तर मंडणगड, संगमेश्वर, लांजा आणि खेड या ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाले आहे.

  3. या निर्णयामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली असून उदय सामंतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Ratnagiri News : गेल्या तीन एक वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीला आता वेग आला आहे. लवकरच प्रत्यक्षात निवडणूकही लागेल. पण त्याआधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वी जाहीर झालं आहे. ज्यात अडीच वर्षासाठी अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यापाठोपाठ आता पंचायत समितीच्या अध्यक्ष पदाचासाठी देखील आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे स्थानिकच्या रणधुमाळीला खऱ्या आर्थाने सुरूवात होणार आहे.

जिल्ह्यातील नऊ पंचायत समितीच्या अध्यक्ष पदाची (सभापती) आरक्षण सोडत मंगळवारी (ता.30) झाली. यामध्ये दापोली नागरिकांचा मागासवर्ग, राजापूर नागरिकांचा मागासवर्ग महिला आणि चिपळूण, गुहागर, रत्नागिरी तीन सभापती सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर मंडणगड, संगमेश्वर, लांजा, खेड सर्वसाधारण महिला सभापतीसाठी राखीव झाले आहे. जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांवर महिलाराज येणार असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ही जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली.

मिनी मंत्रालयाचे मैदान मारण्यासाठी इच्छुकांनी जोरात सराव सुरू केला आहे. नेतेमंडळींसमोर शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. या दरम्यान जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण न पडल्याने निराशा दिसून येत आहे.

Uday Samant
Ratnagiri Politics : तळ कोकणात मनसेला डबल धक्का! खेडेकरांनंतर राज ठाकरेंचा मोठा शिलेदारही भाजपच्या वाटेवर?

जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, गुहागर आणि खेड या पंचायत समिती 1995 पासून चार वेळा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या चार पंचायत समित्या वगळून नागरिकांचे मागस प्रवर्गाचे आरक्षण चिठ्ठीने काढले. त्यामध्ये राजापूर आणि दापोली पंचायत समितीला नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण पडले.

जिल्ह्यातील राजापूर, मंडणगड, संगमेश्वर, लांजा, खेड पंचायत समिती नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे विद्यमान आमदार किरण सामंत, योगेश कदम यांना इच्छुकांना थोपवण्यासाठी फारसी कसरत करावी लागणार नाही.

पण सर्वांत जास्त डोकेदुखी ठरणार आहे ती रत्नागिरी, चिपळूण आणि गुहागर सभापतींची जागा. खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्यामुळे या ठिकाणी महिला किंवा पुरुष कोणीही इच्छुक राहू शकते. त्यामुळे चिपळुण, गुहागरपेक्षा रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांना जास्त कसरत करावी लागणार आहे.

Uday Samant
Ratnagiri Politics : परबांपाठोपाठ जाधवही कदमांचा काटा काढणार?

FAQs :

प्र.१: रत्नागिरी जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत?
उ: जिल्ह्यात एकूण नऊ पंचायत समित्या आहेत.

प्र.२: किती ठिकाणी महिला सभापतीसाठी आरक्षण झाले आहे?
उ: चार ठिकाणी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

प्र.३: कोणकोणत्या ठिकाणी महिला सभापतीचे आरक्षण झाले आहे?
उ: राजापूर, मंडणगड, संगमेश्वर, लांजा आणि खेड.

प्र.४: राजापूर पंचायत समितीत कोणते आरक्षण झाले आहे?
उ: नागरिक मागासवर्ग महिला सभापतीसाठी राजापूर आरक्षित आहे.

प्र.५: उदय सामंतांचा या आरक्षणावर काय परिणाम होणार आहे?
उ: आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलतील आणि उदय सामंतांना तारेवरची कसरत करावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com