Konkan Politics : रत्नागिरी, राजापुरात ठाकरे गटाला धक्का; प्रमुख कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Shivsena News : विकास निधीच्या जोरावर शिंदे गटाने रत्नागिरी, राजापुरात ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे.
Thackeray group activists  join Shinde group
Thackeray group activists join Shinde groupSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. या दोन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Ratnagiri, Rajapur activists of Thackeray group join Shinde group)

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी तालुक्याच्या सोमेश्वर गावातील प्रमुख नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्योग मंत्री सामंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे, तसेच, विकास कामांची हमीही दिली आहे. त्यामुळे विकास निधीच्या जोरावर शिंदे गटाने रत्नागिरीत ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे.

Thackeray group activists  join Shinde group
India Aghadi Coordinator News : इंडिया आघाडीचा समन्वयक मी होणार नाही; तो मुंबईच्या बैठकीत ठरणार ; नीतिशकुमारांची माहिती

सोमेश्वरमधील गावातील तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता नागवेकर, अतिक गडकरी, सुदेश नागवेकर, संदेश नागवेकर, अफसर काजी, राहील सोलकर, अनिकेत नागवेकर, साबीर पटेल, हेमंत नागवेकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Thackeray group activists  join Shinde group
Solapur Politics : 'होय, दारूविक्रीचे गुन्हे असलेला आमचा पदाधिकारी मला भेटला,पण...'; शंभूराज देसाईंची जाहीर कबुली

दुसरीकडे, राजापूर तालुक्यातील ओणी विभागातील शिवसेनेचे युवा पदाधिकारी मनीष लिंगायत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अशफाक हाजू उपस्थित होते.

Thackeray group activists  join Shinde group
Ajit Pawar Group Vs Raut : अजित पवार गटाच्या इशाऱ्याने राऊत भडकले; ‘मला धमक्या देऊ नका, नाहीतर अंगावर कपडे राहणार नाहीत’

या वेळी शंकर लिंगायत, मंगेश लिंगायत, प्रवीण लिंगायत, दीपक लिंगायत, नंदकिशोर लिंगायत, निळू लिंगायत, नितीन माळी, अनिल गुरव, अवधूत गुरव, भूषण चौगुले, मनोहर जैतापकर, बंटी माळी, नीलेश माळी, मनोहर माळी, नारायण माळी, विठ्ठल शेलार, चंद्रकांत लिंगायत, अनिकेत लिंगायत, नितेश लिंगायत, संतोष गुरव, दीपक गुरव, आशिक लिंगायत आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com