Rane Vs Samant: राणे जिंकल्यानंतर रत्नागिरीत मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत; किरण सामंत उद्धव अन् रश्मी ठाकरेंना भेटले...?

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने उमेदवारी जाहीर केल्यापासून किरण सामंत हे नाराज होते. त्यांची नाराजी निवडणुकीचे मतदान पार पडेपर्यंत लपून राहिली नव्हती.
Kiran Samant, Narayan Rane
Kiran Samant, Narayan RaneSarkarnama

Nilesh Rane On Kiran Samant: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयानंतर आता त्यांचे पुत्र निलेश राणे एक खबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना भेटल्याचे वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने उमेदवारी जाहीर केल्यापासून किरण सामंत हे नाराज होते. त्यांची नाराजी निवडणुकीचे मतदान पार पडेपर्यंत लपून राहिली नव्हती. ऐन निवडणुकीच्या दिवशीही सामंत नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तर आता निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर निलेश राणे यांनी किरण सामंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर निलेश राणे (Nilesh Rane) पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, "किरण सामंत हे व्यावसायिक आहेत. व्यावसायिकांवर मी का बोलावे? ते कुठल्याही पदावर नाहीत. त्यांनी मागणी केली त्याला काही तरी आधार लागतो. परंतु, निवडणुकीच्या काळात समन्वय का राखला नाही याचा अभ्यास सामंत यांनी करावा. निवडणुकीत किरण सामंत हे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांना भेटले. ते त्यांना का भेटले माहीती नाही. मात्र, या सर्व गोष्टी आम्ही एकनाथ शिंदेंना सांगणार आहोत, याबाबतचे पुरावेदेखील देणार आहोत. परंतु, सामंत जे वागले ते आम्ही विसरणार नाही."

यावेळी बोलताना राणे यांनी सामंत यांना इशारा दिला. आम्ही विजयी झालो पण काही गोष्टी आम्ही विसरणार नाही. राणेंना माफ करण्याची सवय नाही, अशा शब्दात त्यांनी सामंत बंधुंना इशारा दिला. शिवाय रत्नागिरी विधानसभा हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून काल मी मागणी केली. राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा आमच्याकडे यावेत अशी मागणी केली आहे. भाजपने मला कुडाळ मालवणची जबाबदारी दिली होती. मात्र काही लोकांनी कारण नसताना त्या जागेची मागणी केली होती, मात्र आम्ही त्या मतदासंघात 10 हजार मतांनी मागे असल्याचंही राणेंनी सांगितलं.

Kiran Samant, Narayan Rane
Amol Kirtikar : मुंबईत अमोल किर्तिकरांचा गेम शिंदेंनी नव्हे 'नोटा'ने केला

दरम्यान, उदय सामंत पालकमंत्री आहेत मग त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही पिछाडीवर का आहोत. ते आम्हाला लीड देऊ शकले नाहीत? याबाबत के काही बोलतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही रत्नागिरीमधून अपेक्षा ठेवली होती मात्र तसे आकडे दिसले नाहीत, असं म्हणत त्यांना उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. राणेंनी सामंतावर केलेल्या या आरोपांवर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा राणे-किरण सामंत हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com