Kiran Samant News: किरण सामंत 'नॉट रिचेबल'च्या चर्चा, भाऊ उदय सामंतांचा मोठा खुलासा; तर ठाकरे गटाची मोठी मागणी

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ ऐन मतदानादिवशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे सख्खे बंधू किरण सामंत हे मतदानादिवशी नॉटरिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Uday Samant, Kiran Samant
Uday Samant, Kiran SamantSarkarnama

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024: मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ ऐन मतदानादिवशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे सख्खे बंधू किरण सामंत (Kiran Samant) हे मतदानादिवशी नॉटरिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे. किरण सामंत नॉटरिचेबल असल्याने त्यांचे कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला आहे. तर किरण सामंत नॉटरिचेबल असल्याच्या चर्चांवर आता मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, किरण सामंत (Kiran Samant) हे ग्रामीण भागात फिरत असल्याने त्यांचा फोन लागत नाही. ते सध्या लांजामधील दुर्गम भागात असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं आहे. मात्र, किरण सामंत यांचं ऐन मतदानादिवशी गायब होणं सध्या चर्चेचा विषय बनला आहे. खरंतर कोकणातून यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी किरण सामंत हे इच्छुक होते. मात्र त्यांना या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये या मतदारसंघावरुन मतभेद असल्याचं लपून राहिलं नव्हतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रकार परिषद घेत सामंत बंधूनू आपण लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल असल्याचं जाहीर केल्यामुळे लोकसभा लढवण्याच्या चर्चा बंद झाल्या होत्या. पत्रकार परिषदेनंतर किरण सामंत यांनी भाजप उमेदवार नारायण राणेंचा (Narayan Rane) प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं. शिवाय राणेंचा उमेदवारी अर्ज भरतानाच्या रॅलीतदेखील ते सामील झाले होते.

Uday Samant, Kiran Samant
Raigad Voting Ban News : 13 वर्षांनंतरही पुनर्वसन न झाल्याने 8 हजार ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार...

किरण सामंतांना संरक्षण द्या

मात्र आज ऐन मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉटरिचेबल असल्याने त्यांचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. तर सामंत नॉटरिचेबल होताच ठाकरे गटाने नारायण राणेंवर राणेंवर निशाणा साधला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, किरण सामंत गप्प बसले आहेत म्हणजे कार्यकर्त्यांनी काहीतरी इशारा समजावा. तर किरण सामंत यांना संरक्षण द्यावं, असं निवेदन पोलिसांना दिलं असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं आहे.

किरण सामंतानी केलं मतदान

किरण सामंत हे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरु असतानाच नुकतेच ते पाली येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com