Sangli : पक्षातील अंतर्गत वादामुळे राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी निलेश राणे यांनी केली होती. मात्र, भाजपकडून त्यांची समजूत काढण्यात आली. निलेश राणे हे माजी खासदार आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, सांगलीतील एका कार्यक्रमात निलेश राणे (Nilesh Rane) यांनी विधानसभा लढण्याचे संकेत दिले आहेत.
महाडिक आणि राणे कुटुंबियांचे पहिल्या पिढीपासून स्नेहाचे संबंध आहेत. ते यापुढेही तसेच सुरू राहतील. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर विधिमंडळाच्या सभागृहात सम्राटबाबा आणि निलेश राणे दिसतील, अशी जोरदार राजकीय टोलेबाजी माजी खासदार निलेश राणे यांनी करत विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले.
पेठनाका (ता. वाळवा) येथील 'वनश्री केसरी' बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, आयोजक एम. एम. ग्रुपचे मोहनराव मदने, सतीश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
सम्राट महाडिक यांच्या वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी खासदार निलेश राणे सांगली जिल्ह्यात आले होते. शिराळा विधानसभेसाठी इच्छुक सम्राट महाडिक हे नक्की आमदार होणार, हे सांगताना आपण देखील निवडणूक लढणार असल्याचे सांगत निलेश राणे यांनी दोघांचेही निवडणुकीचे रणशिंग व्यासपीठावरून फुंकले.
राणे यांनी बेधडक अंदाजात बैलगाडी शौकिनांना आपलेसे केले. राज्यातील तुल्यबळ बैलजोड्या या मैदानात दिसत आहेत. एवढे मोठे मैदानाचे आयोजन करणे हे काम तेवढे सोपे नाही. हे केवळ महाडिकच करु शकतात. आमच्या परिवारातील दुसरी पिढीही एकमेकांत जिव्हाळ्याचे संबंध कायम ठेवून आहे. पुढची पिढीही अशीच राहील, असा आशावाद राणे यांनी व्यक्त केला. आमच्या कोकणात अशी रांगडी माणसं लागतील, असे सूचित करत त्यांनी यंदा बाजी मारायचीच असा मंत्र महाडिक यांना दिला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.