Rupali Chakankar controversy:नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या समस्यांमध्ये भर पडत चालली आहे. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर आता रायगडमधील त्यांच्या व्यावसायिक संबंधांबाबत नवे धागेदोरे समोर आल्याने त्यांच्याभोवतीचा वाद अधिकच गडद झाला आहे. तर दुसरीकडे शिवनिका ट्रस्टच्या व्यवहाराप्रकरणी एसआयटी (SIT) कडून समन्स गेल्य.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांना पुष्टी मिळताना दिसत आहे. सुनील तटकरे यांचे बालेकिल्ला असलेल्या रायगडमधील रोहा येथे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्मा कन्स्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून त्यांनी रोह्यातील रोठ खुर्द येथे एक बहुमजली इमारत उभी केली होती. विशेष म्हणजे, या इमारतीचे बांधकाम अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा दावा करत भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केला होता. याप्रकरणी बबलू सय्यद यांनी माणगाव न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे चाकणकर आणि चौधरी यांच्या व्यावसायिक युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
त्यासोबतच तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आकाश चौधरी यांच्या नावावर अनेक मोठ्या कंपन्यांची नोंदणी आहे. यात प्रामुख्याने ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड आणि कर्जत रिव्हर राफ्टिंग, गीता ॲग्रो ॲन्ड इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटॅलिटी आणि रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट यांसारख्या व्यवसायाचा समावेश आहे.
तर दुसरीकडे अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला मोर्चा खरातशी संबंधित शिवनिका या संस्थेकडे वळवला आहे. या संस्थेच्या सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे.
त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यासह संस्थेच्या आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच खरातशी असलेल्या ओळखीमुळे रुपाली चाकणकर आता पूर्णपणे कायदेशीर कचाट्यात सापडल्या आहेत. या सर्व प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.